Home Maharashtra वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा…...

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा… — वाढदिवसाच्या निमित्ताने दुचाकी रॅली काढून गरजू रुग्णांनासह बेघर,बेवारस निराधारांना केली फळे वाटप…

   उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक

  चिमूर :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांचा ७२ वा वाढदिवसानिमित्त १० मे ला वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूर पूर्व तसेच वंचित बहुजन आघाडी तालुका चिमूर कडून साजरा करण्यात आला.

       चिमूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दुचाकी रॅली ला सुरुवात झाली.

              प्रथम ही दुचाकी रॅली चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पोहचली व तिथे आंतर भरती रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप केले.याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालय चिमुरचे वैद्यकिय अधिकारी श्री. डॉ.सुहास बेंडले,तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते.

        त्यानंतर ही दुचाकी रॅली जामगाव (को.) येथील दिव्यवंदना आधार फाउंडेशन संचालित बेघर,बेवारस,निराधार लोकांकरिता असलेल्या पुनर्वसन केंद्रात पोहचली.

       दिव्यवंदना आधार फाऊंडेशन बेघर बेवारस पुनर्वसन केंद्र जामगाव चे संचालक श्री.शुभमजी पसारकर यांच्या उपस्थितीत तसेच या पुनर्वसन केंद्रात निवासी असलेल्या बेघर,बेवारस,निराधार असलेल्या लोकांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.तसेच फळ व बिस्किटांचे वितरण करण्यात आले.

            यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. स्नेहदीप खोब्रागडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या जिवन प्रवासावर तसेच वंचित बहुजन आघाडीच्या ध्येयधोरणांवर थोडक्यात माहिती दिली व उपस्थित निवासी असलेल्या रुग्णांचे मनोबल वाढविले.

    तसेच श्री.शुभम पसारकर यांचे कडून अनेक वर्षापासून निस्वार्थपणे करत असलेल्या या स्तुत्य कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि तिथून ही रॅली भिसी मार्गे शिवरा इथे पोहचली.

       तिथे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त दुचाकी रॅलीत सहभागी असलेल्या पदाधिकाऱ्यांना भोजन व्यवस्था चिमूर तालुका अध्यक्ष श्री. कैलासजी वाघमारे यांनी केली.

         तिथून ही दुचाकी रॅली कवडशी,डोमा,नवतळा,लोहारा, बोडधा ,नेरी मार्गे चिमूर इथे रॅली चा समारोप झाला.

        श्रद्धेय बाळासाहेबांच्या जन्मदिना प्रित्यर्थ काढलेली ही रॅली अनेक गावातून गेल्याने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.या दुचाकी रॅली मध्ये चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री.स्नेहदीप खोब्रागडे,चंद्रपूर जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष शुभम मंडपे,चंद्रपूर जिल्हा सचिव श्री.धर्मवीर गराडकर,जिल्हा सदस्य श्री.नारायण कांबळे,चिमूर तालुकाध्यक्ष श्री.कैलास वाघमारे,तालुका उपाध्यक्ष श्री.शैलेश गायकवाड,विकास घोनमोडे,तालुका संघटक श्री.प्रफुल खोब्रागडे,शहर अध्यक्षा महिला आघाडी सौ.सुरक्षा अंबादे,श्री.भागवत बोरकर,श्री.मिलिंद राऊत,श्री.रामचंद्र गेडाम,श्री.उत्तम रामटेके,श्री.दुर्योधन मेश्राम,श्री.हरिदास अंबादे,श्री.गोपी घुटके,श्री. विकेश जनबंधू,श्री.सोनल गायकवाड,श्री.गातीब सातार्डे आदि मान्यवर पदाधिकारी,सदस्य सहभागी झाले होते.