भरतरी नाथाच्या पावन भुमीमध्ये सप्ताहाच्या प्रारंभाला  श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर (मळवली) तर श्री गुरु बाळासाहेब महाराज देहुकर(पंढरपुर) यांची काल्याच्या किर्तनाने शेवटी सांगता होणार… — काल्याच्या कीर्तनातून श्री गुरु बाळासाहेब महाराज भाविकांना किर्तन सेवेतून काय कान मंत्र सांगतील यांची उत्सुकता लागली आहे.

 

निरा नरसिंहपुर दिनांक :12

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार, 

निरा नरसिंहपुर भागातील टणु प्रमाणे सहीत सर्व गावावर देहुकर कुटुंबाचे प्रेम आणि आशीर्वाद भाविकांवर व ग्रामस्थांवर आहे. त्यांच्या मार्ग दर्शनाखाली चालु आसलेला श्री तुकोबाराय गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात चालु आहे. आज अखेर या परिसरातील सर्व भाविक भक्तांवर श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर (मळवली),, श्री गुरु. बाळासाहेब महाराज (पंढरपूर),,श्री गुरु कानोबा महाराज देहुकर,,श्री गुरु सोहम महाराज देहुकर यांचे आशीर्वाद व प्रेम पाटीशी आसल्यामुळे चालत आलेली परंपरे पासुन शेवा चालु आहे.भरतरी नाथ मंदिरात सप्ताहामधे सालाबाद प्रमाणे शेवटी पंढरपूर येथील श्री गुरु बाळासाहेब महाराज देहुकर यांच्या उपस्थित गुरुवार दिनांक 13/ 4/ 20 23 रोजी सकाळी 7 ते 8 दिंडी प्रदक्षिणा होऊन 9 ते 11 या वेळेत काल्याच्या कीर्तनाची सांगता होईल.

 टणु गावचे ग्रामदैवत भरतरी नाथाच्या पावन भूमीमध्ये टणु गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने हा सोहळा सालाबाद प्रमाणे चालु आसून. 24 व्या वर्षाला प्रारंभ झाल्याने शेवटी काल्याच्या कीर्तनाची सेवा ही श्री गुरु बाळासाहेब महाराज देहुकर पंढरपूर यांची होनार आसल्याचे टणु येथील भाविक भक्तांच्या वतीने सांगण्यात आले.

दररोज सर्वच भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितत राहतात. हरिनाम सप्ताहासाठी आलेल्या सर्व भाविक भक्त व ग्रामस्थांसाठी संपूर्ण आन्नदान,व महाप्रसादाची सेवा ही टणु ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे .

  ग्राम पंचायत टणु विद्यमान सरपंच, उपसरपंच, व आजी, माजी, सरपंच,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हायच चेअरमन व सर्व सदस्य, समस्त ग्रामस्थ आणि भजनी मंडळ टणु यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा करण्यात येत आसतो. असंख्य भाविक भक्त या सप्ताहाच्या सोहळ्यामध्ये सामील होत आहेत . 

सर्व ग्रामस्थ, भाविक भक्त, तसेच विणेकरी, टाळकरी, मृदंग वादक, व भाविक हरिनाम सप्ताहासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.