शारीरिक अत्याचार करणारा युवक गजाआड.. — पिडीत मुलीचे शरीरिक शोषण करून तो झाला होता फरार.. — विविध कलमान्वये आरमोरी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल..

प्रितम जनबंधु 

   संपादक 

आरमोरी :- तालुक्यातील मौजा मागदा येथील युवकाने लग्नाचे आमिष दाखवून गावातीलच १८ वर्षाच्या मुलीला २ नोव्हेंबर २०२३ रोजी गडचिरोलीला रुमवर घेऊन गेला आणी पीडित युतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याची गंभीर घटना पुढे आली आहे. 

              त्यानंतर लग्नाला नकार देत तीला तिथेच सोडुन फरार झाला.खुप उशीर झाला पण तो परत आला नाही,त्यामुळे आपल्याशी धोका झाल्याचे सदर मुलीच्या लक्षात आले. 

         पीडित युवतीने सबब हकिकत आपल्या कुटुंबीयांना सांगितली.आपल्या मुलीवर अन्याय झाल्याचे लक्षात येताच पीडित मुलीचा मावसभाऊ, वडील,यानी मुलीला सोबत घेऊन आरमोरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.   

              सदर मुलीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी ताबडतोब माहीतीची सुत्रे हलवली आणी दी.८ नोव्हेंबर २०२३ रोजी आरोपीला मौजा मागदा येथे अटक करण्यात आली आहे.

                            

           आरोपी शुभम तुलसीदास काशीकर वय २३ वर्ष मु. मागदा,तह.आरमोरी,जि. गडचिरोली येथील रहिवासी असुन त्याचेवर भांदवी कलम ३७९(२०२३),,३७६(२)(n),,४१७,,२९४,,३२४,, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन ३ दिवसाचा पिसीआर देण्यात आला असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. 

           पुढील तपास आरमोरी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक मंडलिक याचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक ज्योती राक्षे करीत आहेत.