उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
इयत्ता १० वी व १२ वीचे निकाल लागलेत. जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर राजकीय मंडळी, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटनांनी वाजागाजा करून गुणवंतांच्या सत्काराच्या कार्यक्रम केलेत.
यात अनेकदा ग्रामीण भागातील सच्चे गुणवंत डावलले जातात जे निखळ पणे विपरीत परिस्थितीत स्वकर्तुत्वाने गुणवंत ठरतात.
त्यांना योग्य मार्गदर्शनापासून कोसो दूर राहावे लागते. मात्र नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव, मिंथूर येथील प्रावीण्य प्राप्त विदयार्थी व विद्यार्थीनींना शिक्षणप्रेमी चव्हाण परिवार कुठलाही वाजागाजा न करता छोटेखानी पण सुंदर कार्यक्रम घेऊन स्वखर्चाने उपकृत करतात व ही परंपरा गत १५ वर्षापासून सुरू आहे.
यंदाही मार्गदर्शन व मान्यवरांच्या उपस्थितीत दि. १२ जुलै ला या ग्रामीण भागातील पन्नासावर खऱ्या गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडणार आहे.गोड भेटवस्तू देऊन, मार्गदर्शन देऊन चव्हाण परिवार ही परंपरा कायम ठेवण्यासाठी लालाचीत आहे.
मिंथूर येथील समाज मंदीरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ग्रामीण परिसरातील गुणवंतांना चव्हाण बंधूंनी स्वतः आमंत्रित केले आहे.
ईश्वर- रखुमाई चव्हाण यांच्या स्मरणार्थ दरवर्षी गुणवंतांच्या पाठीवर थाप देण्यासाठी निस्वार्थ भावनेने, स्वखर्चाने चंद्रपूर निवासी चव्हाण परिवार या महत कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो.
संपन्न होणाऱ्या या समारंभाचे अध्यक्षस्थानी डॉ. संदीप गेडाम, अतिथी म्हणून ऍड. शामिंल रामटेक, मिंथूर येथील सरपंचा विशाखा ताई डोंगरे राहतील तर प्रमुख म्हणून राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा.महेश पानसे, ने.हि. विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद भैया, अरूण चव्हाण आहेत.
नवेगाव पांडव, मिंथूर या ग्रामीण परिसरातील गुणवंत विदयार्थी दरवर्षी या मधूर कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट बघतात हे विशेष.



