Home Vidarbha चव्हेला येथे मोरी वर पडला खड्डा बांधकाम विभागाचे दुर्लक्ष… 

चव्हेला येथे मोरी वर पडला खड्डा बांधकाम विभागाचे दुर्लक्ष… 

भाविकदास करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी 

 धानोरा पेंढरी मार्गावर चव्हेला येथे रोडवर असलेली मोरीवर खड्डा पडला आहे तो खड्डा रस्त्याच्या मधोमध असल्यामुळे तो जीवघेणा खड्डा होऊ शकतो हा खड्डा कित्येक दिवसात पासून आहे परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे दुर्लक्ष झालेले दिसून येते.

     त्यामुळे ग्रामपंचायत चवेलाने कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.२,गडचिरोली यांना पत्र देऊन गड्डा बुजवण्याची विनंती केली आहे.या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

       वाहनाना धोकादायक ठरण्याची वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर मोरी बांधकाम नव्याने त्वरित दुरुस्त करून देण्यात यावे. या आशयाचे निवेदन उपविभागीय अभियंता जि. प. उपविभाग धानोरा, यांना देण्यात आले.