भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
काल 10 जुन सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या दरम्यान अचानक वादळ पाऊस आल्याने मुखरू श्रीराम मुंडले रा हेटी यांचे घरावर चिंचेचे झाड वादळामुळे पडले त्यामुळे त्यांच्या घरावरील सिमेंट पत्रे फुटले, घराचे नुकसान होऊन भिंती ला भेगा गेल्या आहेत.झाड खुप मोठा असल्याने पत्रे तुटून थेट खोलीत असलेल्या पलंगावर झाडाचे मोठं मोठे फ़ांद्या घुसल्या सुदैवाने मुखरू यांची पत्नी सुरेखा व मुलगा रोहित त्याच ठिकाणी बसले होते.अचानक काही तरी पडत असल्याचा भास झाला त्यामुळे आई मुलगा दोघेही उठून बाजूला झाले, त्यामुळे खुप मोठी जीवित हानी टळली.
बाईक चकणाचूर :– आठ दिवसापूर्वी मुखरू मुंडले यांचा मुलगा नवीन बाईक पल्सर घेतली होती, बाइकवर चिंचचे खुप मोठे झाड पडल्याने नवीण पल्सर चा चकणाचूर झाला. तर त्या ठिकाणाहून गेलेले विद्युत तारा तुटून अस्त व्यस्त पडले आहे.शासनाने यांचा मोका चौकशी करून आर्थिक साहाय्य देण्यात यावे अशी मागणी मुखरू मुंडले यांनी केले आहे.



