Home Maharashtra तीन दिवसापासून धानोरा शहर व तालुका अंधारात… 

तीन दिवसापासून धानोरा शहर व तालुका अंधारात… 

भाविकदास करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधी 

     सोमवार सायंकाळी आलेल्या वादळामुळे गेल्या 40 तासापेक्षा जास्त धानोरा शहर व संपूर्ण तालुक्याची जनता अंधारात दिवस काढत आहे याचा जनतेला खूप त्रास होत आहे. विद्युत कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.

         वादळामुळे चातगाव रस्त्यावर मोठे मोठे झाड उलमाडून पडले आहे त्यामुळे सोमवारी रात्रौला अनेक वाहने रस्त्यातच अडकडून पडले होते तर दुसऱ्या दिवशी मंगळवार ला पुन्हा वादळ पाऊस आल्याने आज धानोरा येथे वाहन फसून असल्यामुळे धानोरा मुरूमगाव छत्तीसगड जाणारी वाहतूक बंद आहे.

       वाहणाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे तसेच व विजेचे खांब वादळमुळे पडले असल्यामुळे धानोरा शहर व संपूर्ण तालुका तीन दिवसापासून अंधारात आहे विद्युत कर्मचारी वीज सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे त्यांच्या कामात रात्रीचा पाऊस आणि वादळ भर घालत आहे विजा कडाडत असल्यामुळे लाईन सुरळीत करण्यात थोड वेळ लागत आहे असे सांगण्यात आले .

          आ.डॉ. मिलिंद नरोटे स्वतः पूर्ण परस्थिती वर लक्ष ठेऊन आहेत.विद्युत विभागाच्या अभियंता यांच्याशी सतत संपर्कात आहेत.त्यांच्या अडचणी तातडीने सोडवून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी त्यांना सर्व मदत देत आहेत.निसर्गाने साथ दिली तर आज सायंकाळपर्यंत विद्युत पुरवठा पूर्ववत होईल.