शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
मागील दोन दिवसांपासून चिमूर तालुक्यातील मौजा पळसगाव (पिपर्डा) येथील विद्युत पुरवठा खंडित असल्याने स्थानिक उपसरपंच तुळशिदास शेरकुरे यांच्यासह गावातील नागरिकांनी मौजा मासळ येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केले.
वादळीवाऱ्यासह अचानक पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणची झाडे कोसळली.यामुळे अनेक ठिकाणचा विद्युतपुरवठा खंडित झालाय.
विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना कृतीम सुविधांचा फटका बसलाय.मागील दोन दिवसांपासून मौजा पळसगाव (पिपर्डा) सह मासळ परिसरातील गावांमध्ये लाईन नसल्याने गर्मीच्या दाहकतेत घरी राहायचे कसे?हा प्रश्न नागरिकांना पडलाय.
विचित्र प्रकारे उष्ण वातावरण असल्याने नागरिकांच्या शरिराची लाहीलाही झाली आहे.सहन करण्यापलीकडचे उष्णतामान सुरू आहे.यामुळे त्वरित विद्युत पुरवठा सुरू करणे विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे काम आहे.
तद्वतच रात्रोच्या वेळी जंगली प्राण्यांचा वावर कधीकाळी गावात होत असल्याने काळोखात नागरिकांना संरक्षण करणे कठीण असते.यामुळे विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तथा कर्मचाऱ्यांनी चिमूर तालुक्यातील मौजा पळसगाव (पिपर्डा) येथील लाईट नियमित सुरू ठेवावी अशी अपेक्षा उपसरपंच तुळशिदास शेरकुरे यांनी व्यक्त केली आहे.



