Home Maharashtra विविध मागण्यांसाठी पारशिवनी मध्ये कृषी सहायकांचे आंदोलन… — टप्प्या टप्याने आंदोलनाची...

विविध मागण्यांसाठी पारशिवनी मध्ये कृषी सहायकांचे आंदोलन… — टप्प्या टप्याने आंदोलनाची हाक, १५ मेपासून बेमुदत कामबंदचा इशारा..

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- कृषी सेवकांना नियमित पदोन्नती, पदनाम बदल, डिजिटल सुविधा आणि निविष्ठा वाटपातील त्रुटी दूर करण्यासह विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दिनांक ७ मे रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पारशिवनी येथे आंदोलनाचा तिसरा टप्पा पार पडला. यावेळी तालुका कृषी कार्यालया समोर जोरदार घोषणाबाजी करत कृषी सहायकांनी धरणे आंदोलन केले.

           महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना, शाखा पारशिवनी चे तालुका कार्य अध्यशक्ष विवेकानंद शिंद, अध्यक्ष विक्रम देशमुख, सचिव प्रशांत बोरसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभे राहिले असून मागण्या मान्य होई पर्यंत टप्प्या टप्प्याने आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा पारशिवनी शाखा संघटनेने दिला आहे.

           कृषी सेवकांचा कालावधी रद्द करून त्यांना थेट कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती द्यावी, कृषी सहाय्यक या पदाचे नामांतर सहाय्यक कृषी अधिकारी करावे, डिजिटल युगातही लॅपटॉपपासून वंचित असलेल्या कृषी सहाय्यकांना तातडीने लॅपटॉप वितरित करावेत, ग्रामस्तरावरील कामासाठी कृषी मदतनीस उपलब्ध करून द्यावेत.

.       पारशिवनी येथील तालुक कृषी अधिकारी कार्यालया समोर आंदोलन करताना कृषी सहायक.

        निविष्ठा वाटपात नियोजन शून्यता असून, त्यासाठी वाहतूक भाड्याची तरतूद करावी किंवा परमिट प्रणाली लागू करावी; अन्यथा खरीप २०२५ मध्ये निविष्ठा वाटपावर बहिष्कार टाकण्यात येईल, कृषी विभागाच्या आकृतीबंधाला तातडीने मंजुरी देऊन पदोन्नतीतील अडथळे दूर करावेत, पोकरा योजनेतील समूह सहाय्यकांची पदे पूर्ववत भरावीत, एमआर इ जी एस योजनेंतर्गत लक्ष्य ठरवताना स्थानिक अडचणींचा विचार करावा, नैसर्गिक आपत्तीनंतरच्या पंचनाम्यांबाबत स्पष्ट कार्यपद्धती ठरवावी, कृषी सहाय्यक आस्थापना संदर्भातील संवर्गाच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात आदी प्रमुख मागण्या आहेत.

         या आंदोलनात दि.८ रोजी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. दि.९ रोजी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे तर दि.१५ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलनाची हाक संघटनेने दिली आहे.

          शासनाकडे मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली असून, अन्यथा संपूर्ण कृषी यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही कृषि विभाग पारशिवनी येथील कृषी सहायक सगठन चे कृर्षी सहायक विवेकानंद शिंदे -कार्यअध्यक्ष पारशिवनी कृषी सहायक संघटना, अविनाश ढोले -अध्यक्ष, विक्रम देशमुख -सचिव प्रशांत बोरसे, कुमारी पल्लवी ठोकर, कुमारी साधना कांबळे, कुमारी श्वेता अबुज, श्री रविंद्र सोरमारे, अमित झोड, प्रमुख्याने उपस्थित होते यांनी यावेळी देण्यात आला.