शासन आपल्या दारी या अंतर्गत विविध जनकल्याणकारी योजना थेट सामान्यापर्यंत पोहोचवा, खासदार अशोक नेते या़ंचे लगाम येथील शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमाप्रसंगी प्रतिपादन…

 

दखल न्यूज भारत

विजय शेडमाके

    मुलचेरा:- वरील प्रमाणे कार्यक्रमाला विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करून या माध्यमातुन विविध योजनांचे स्टाल उपलब्ध केले होते.यानिमित्ताने जनतेपर्यंत विविध योजनांची माहिती व लाभ घ्यावा असे आव्हान खासदार अशोक नेते यांनी उदघाटक कार्यक्रमाप्रसंगी केले.

    खासदार अशोकजी नेते यांनी शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करतांना सरकारी योजनेचा उद्देश म्हणजे सर्व नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारने राबविल्या जाणारे योजना होय.त्यामुळे शासनाच्या विविध योजना जनसामान्यपर्यंत पोहचवून लाभ देण्यात यावे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत.कोणत्याही शासनाच्या या योजनेचा लाभ सामान्य नागरिकांना देण्यास किंवा योजनांची माहिती काही अधिकारी वर्ग सुद्धा हलगर्जीपणा करतात.

      त्यामुळे जनसामान्य लोकांपर्यंत योजनेचा लाभ भेटत नाही.शासनाचे विविध योजना विषयी व लाभार्थीचे विषयी अधिकारी वर्ग हलगर्जीपणा केल्यास त्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही.यावेळी केंद्रशासनाच्या विविध योजनाविषयी माहिती उपस्थितांना खासदार महोदयांनी देऊन शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवा असे प्रतिपादन याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.

       या प्रसंगी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते,भाजपा जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे,प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा चे प्रकाश गेडाम, उपविभागीय अधिकारी तोडसाम साहेब,तहसिलदार सर्वेश मेश्राम, बिडिओ जुवारे साहेब,मुलचेराचे परि. तहसीलदार करिश्मा चौधरी,तालुका कृषि अधिकारी विकास पाटील, गटशिक्षणाधिकारी गौतम मेश्राम, सरपंच रोशनी कुसनाके,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गणपतीजी, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संजूभाऊ सरकार,रितेश चिंदमवार,तसेच शासकीय योजनांची जत्रातील अधिकारी वर्ग व मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.