उपविभाग एटापल्ली अंतर्गत पिपली बुर्गी येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना.

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

गडचिरोली:-नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा, दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांचा विकास साधावा व नक्षल कारवायांना आळा बसावा, यासाठी गडचिरोली पोलीस दलाने आज दिनांक ११/०५/२०२३ रोजी उपविभाग एटापल्ली अंतर्गत पिपली बुर्गी या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली.

       सदर पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण १००० मनुष्यबळ, १० जेसीबी, १० ट्रेलर, ०३ पोकलेन, ४० ट्रक इत्यादीच्या सहायाने अवघ्या एका दिवसांत पोस्ट उभारणी करण्यात आली. पोस्टमध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, २० पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लॅट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल इत्यादींची उभारणी करण्यात आली. यासोबतच पोस्ट सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे ०५ अधिकारी व ६१ अंमलदार, एसआरपीएफचे ०१ अधिकारी व ४८ अंमलदार तसेच सीआरपीएफचे ०१ असिस्टंट कमांडन्ट ०९ अधिकारी व ७७ अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोस्ट उभारणी कार्यक्रमात जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. त्यात पिपली बुर्गी येथील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना सलवार सुट, नव्वारी साडी, पुरुषांना धोतर, लोअर पॅन्ट, चप्पल, ब्लॅकेट, चादर, टि-शर्ट, मुलींना सायकल, नोटबुक, फ्रॉक, कंपास, चॉकेट्स, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.

       सदर नवीन पोलीस मदत केंद्र उभारणीच्या कार्यक्रमास गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक  श्री. संदीप पाटील सा., सिआरपीएफचे पोलीस उपमहानिरिक्षक श्री. जगदीश मीणा सा., गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., सिआरपीएफ १९२ बटालियनचे कमान्डंट  श्री. देव राज सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  श्री. अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  श्री. कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी  श्री. यतिश देशमुख सा., उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली श्री. सुदर्शन राठोड, पिपली बुर्गीचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी श्री. वैभव रुपवते हे उपस्थित होते.