पातागुडम पोलीस अंमलदार उध्दव केंद्रे यांनी आपलं वाढदिवस आदिवासी बांधवासोबत साजरा केले…. — अति दुर्गम गरजूंना साड्या व लुंगी वाटप…

रमेश बामनकर

अहेरी तालुका प्रतिनिधी

             अहेरी :-जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या सिरोंचा पोलीस उपविभागीय कार्यालया अंतर्गत येत असलेल्या पातागुडम पोलीस मदत केंद्रात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार उद्धव केंद्रे यांनी आपलं वाढदिवस अनोख्या पद्धतीने आदिवासी बांधवसोबत केक कापून अति आनंदात उत्साहित साजरा करून हद्दीतील गरजू व गरीब महिला व पुरुषाना साड्या व लुंगी वाटप केले. 

            पोलीस अंमलदार उद्धव केंद्रे यांनी आपलं आंनद हद्दीतील अदिवासी बांधवा सह वाटून घेतले व उपस्थित सर्व महिला व नागरिकांना अल्पोपहार घेऊन वाढदिवस साजरा केले याप्रसं पोस्टाचे प्रभारी श्री लोसरवार साहेब, पो उपनि तळेकर साहेब, पो उपनि तू तुरवाड साहेब सहकारी मित्र गौतम गवई, गौरव चरकुरवार, बाळासाहेब साठे, बाबासाहेब डोळे, सुरेश मुंडे, सोमय्या रेगा कार्यक्रमाला उपस्थित होते.