Home Social महाराष्ट्र धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना कार्यकर्ता शिबिर १३ एप्रिल ला...

महाराष्ट्र धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना कार्यकर्ता शिबिर १३ एप्रिल ला भिसीत…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी.. 

        महाराष्ट्र धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना कार्यकर्ता शिबिराचे आयोजन १३ एप्रिल २०२५ रोज रविवारला करण्यात आले आहे.सदर कार्यकर्ता शिबिर,”शिवाजी पब्लिक स्कूल तथा ज्युनिअर कॉलेज भिसी,येथे होणार आहे.

      कार्यक्रमाचे उद्घाटक शिवाजी पब्लिक स्कूल तथा ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य श्री.ज्ञानेश्वर शिरभय्ये करणार आहेत तर शिवाजी पब्लिक स्कूल तथा ज्युनिअर कॉलेज चे संस्थापक श्री.नितेश उघडे हे कार्यकर्ता शिबिराचे अध्यक्ष असणार आहेत.

      कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य धनगर महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री.अशोकराव शेळके असणार आहेत.

      १२ ते २ वाजता पर्यंत मार्गदर्शन होणार आहे.यानंतर अर्धा तास विश्रांती असणार आहे.या विश्रांती नंतर अडिच ते साडेतीन वाजता पर्यंत परत मार्गदर्शन केले जाणार आहे.

      यानंतर समारोपीय कार्यक्रम होणार आहे.