Home Social अखेर जिल्ह्यातील रुग्णालयातंर्गत सर्व सफाई कामगारांना मिळाले पाच महिन्याचे प्रलंबित वेतन… ...

अखेर जिल्ह्यातील रुग्णालयातंर्गत सर्व सफाई कामगारांना मिळाले पाच महिन्याचे प्रलंबित वेतन… — कामगार नेते छोटु भाई यांच्या प्रयत्नाला यश… — सफाई कामगार तर्फे छोटू भाई शेख यांचा सत्कार…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

      चिमूर उपजिल्हा रुग्णालय सफाई कामगारांच्या वतीने छोटूभाई शेख यांना शाल पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आलाय.यावेळी कामगार व सहकारी उपस्थित होते.

             चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील सफाई 2018-19 मध्ये पाच महिन्याचे हक्काचे वेतन बुडवण्याचं काम ठेकेदार व प्रशासनाने केले होते आणि यावेळी सुद्धा ठेकेदार कंपनी काम सोडून परतल्याने पाच महिन्याचे वेतन बुडण्याची दाट शक्यता होती.

     कामगारांच्या समस्या बाबत छोटू भाऊ यांनी सतत पाठपुरावा केला व बैठकी अंतर्गत प्रशासनाला जबाबदार बनवून वेतन देण्यात भाग पाडल्याने मागील ५ महिन्याचे प्रलंबित वेतन मिळाल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्यामुळे छोटूभाई यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार व आभार व्यक्त केले.

       यावेळी सफाई कामगार उपस्थित होते.