मृत्यू आणि जन्माच दुःख हे हरी नामाच्या भक्ती सागरा पुढे आम्हाला काही वाटत नाही. :- ह भ प प्रकाश बोधले. — तर आई व वडील हे दैवतास समानच….

 

निरा नरसिंहपुर दिनांक :11

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार, 

भीमानदी व निरा नदीच्या मध्यभागी टणु गावचे ग्रामदैवत भरतरी नाथाच्या पावन भूमीमध्ये टणु गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने हा सोहळा सालाबाद प्रमाणे चालु आसून. 24 व्या वर्षाला प्रारंभ झाल्याने पाचव्या दिवसाची सेवा ह भ प प्रकाश महाराज बोधले डिकसळ यांची करण्यात आली कीर्तन सेवा प्रसंगी.

  प्रकाश महाराज बोधले बोलत आसताना म्हणाले की मृत्यू आणि जन्माचे दुःख भक्तीच्या सागरा पुढे आम्हाला काही वाटत नाही योग्ये आठाविस युगापासून पंढरीचा पांडुरंग उभा आहे. आत्ता तुझ रूप आहे हे रूप ज्या ठिकाणी आहे. त्याच ठिकाणी आमचं चित्त आहे. आई व वडील हे दैवता समान आसल्याने त्यांची सेवा करणे हाच परमार्थ मोठा आहे. प्रकाश बोधले महाराज यांचे सप्ताह प्रसंगी उद्गार.सर्वच भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरिनाम सप्ताहासाठी आलेल्या सर्व भाविक भक्त व ग्रामस्थांसाठी संपूर्ण आन्नदान सेवा ही टणु ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.

  ग्राम पंचायत टणु विद्यमान सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हायच चेअरमन व सर्व सदस्य, समस्त ग्रामस्थ आणि भजनी मंडळ टणु यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा करण्यात येत आसतो. असंख्य भाविक भक्त या सप्ताहाच्या सोहळ्यामध्ये सामील होत आसतात . गिरवी, ओझरे, संगम, बाभुळगाव, नरसिंहपुर, पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी बावडा भांडगाव गारआकोले टाकळी ,टणु , गोंदी, बिजवडी येथील सर्व ग्रामस्थ, भाविक भक्त, तसेच विणेकरी, टाळकरी, मृदंग वादक, व भाविक हरिनाम सप्ताहासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.