गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान या उपक्रमांतर्गत ई-लर्निंग स्कुल या पायलट प्रोजेक्टचे उदघाटन… — पोमकें कोटगुल व अतीसंवेदनशिल पोमकें नारगुंडा येथील विद्यार्थ्याच्या ई-लर्निंगसाठी टीव्ही संचाचे वाटप…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

गडचिरोली :गडचिरोली पोलीस दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांच्या संकल्पनेतून प्रोजेक्ट उडाण सर्वकष सक्षमीकरण हा उपक्रम युवकांना रोजगार, कला, साहित्य, व खेळ यामध्ये संधी प्राप्त करुन देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आला असून या उपक्रमांतर्गत “एक गाव एक वाचनालय” या योजनेतंर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरिक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी तसेच त्यांच्या उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी यासाठी जिल्ह्यात ६० विविध ठिकाणी वाचनालयाची निर्मीती करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. सदर वाचनालयामधील विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून धडे घेता यावे यासाठी गडचिरोली पोलीस दल, आदर्श मित्र मंडळ पुणे व लक्ष्मीनृसिंह पतसंस्था, बल्लारशा यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कल्याण अंतर्गत असलेल्या सरस्वती विद्यालयामध्ये ई-लर्निंग स्कुल या पायलट प्रोजेक्टचा आज दिनांक ११/०४/२०२३ रोजी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला.

आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून दुर्गम व अतिदुर्गम भागातील एकूण २६ पोस्टे / उपपोस्टे / पोमकें या ठिकाणी नवीन सुसज्ज व आधुनिक सार्वजनिक वाचनालयाची निर्मीती करण्यात आलेली आहे. पोमकें कोटगुल व अतिसंवेदनशिल अशा पोमकें नारगुंडा या ठिकाणी वाचनालयामध्ये ई-लर्निंगचे धडे विद्यार्थ्यांना घेता यावे यासाठी टीव्ही संच वाटप करण्यात आले आहे. ई-लर्निंग स्कुल प्रोजेक्टमध्ये इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ठ आहे. तसेच ६५० सायन्स प्रोजेक्ट, स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रमाचाही समावेश आहे. संपूर्ण अभ्यासक्रम चित्रांकीत तसेच ध्वनिमुद्रीत केला असल्याने विद्यार्थ्यांना समजून घेण्यास सोपे आहे.

सदर उद्घाटन सोहळ्यास गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा.अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा. तसेच श्री. उदय जगताप, आदर्श मित्र मंडळ, पुणे, श्री. श्रीनिवास सुंचुवार, लक्ष्मीनृसिंह पतसंस्था, बल्लारशा हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. नरेंद्र पिवाल व अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. धनंजय पाटील व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.