राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या तालुका अध्यक्षपदी संदीप ऋषी शेदरे यांची नियुक्ती…

     रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि

चिमूर:-

          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार तसेच राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खा.प्रफुलभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. सुनिलजी तटकरे तसेच ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी आखाडे यांच्या मान्यतेने अविनाश आ.राऊत जिल्हाध्यक्ष ओ.बी.सी. विभाग चंद्रपूर जिल्हा यांनी संदिप रुषीजी शेंदरे,राहणार सावरगाव तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर यांची राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या चिमुर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

           राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ध्येयधोरणानुसार ओबीसी विभागाच्या माध्यमातून पक्ष संघटन वाढविण्यासाठी कार्य करीत रहावे या अपेक्षेसह निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच शुभेच्छा दिल्या.

           यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ भटारकर चिमूर विधानसभा अध्यक्ष अरविंद भाऊ रेवतकर तालुकाध्यक्ष चिमूर योगेश ठूने, सुखदेव गराटे , रवींद्र राऊत , अरविंद राऊत चंद्रशेखर कुंभारे , सुरज मोहीनकर , अमोल मोहनकर , श्रीकांत पोहनकर , मोंटू भरडे ,विवेक दडमल व इतर पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.