प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत जिल्ह्याल्या मिळालेले उद्दिष्ट वाढवा आणि त्यातल्या चुका त्वरित दुरस्त कराव्यात.:- आमदार समीर कुणावारची मागणी..

 सैय्यद जाकीर 

जिल्हा प्रतिनिधी वर्धा

      वर्धा :- प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गोर-गरीबांना घरे मिळाले पहिजे यासाठी क्रांतिकारी योजना दिली आहे आणि ही घरकुल योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात सुद्धा येत आहे.

        महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या लोकांना जास्तीत जास्त घरकुलचा लाभ व्हावा,म्हणून प्रधानमंत्री आवास योजना ही मागच्या मार्च महिण्यातील अधिवेशनात जाहिर केली.

            त्यानुसार महाराष्ट्रातील बरेच ओबीसी धारक घरकुलाच्या प्रतिक्षेत आहेत,त्यांना अजुनही घरकुल मिळाले नाही.वर्धा जिल्ह्यामध्ये जे उद्दिष्ट आलेले आहे,त्या उद्दिष्टानुसार वर्धा जिल्ह्याल्या 14 हजार 855 घरकुलाचे उद्दिष्ट मोदी आवास योजने अंतर्गत अपल्याला मिळालेला आहे.

      याविषयी पी.टी.आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असताना लक्षात आले की,हा लक्षांक अतिशय कमी आहे.

           म्हणून आमदार समीर कुणावार यांनी पूर्ण यादी मागितली आणि सदर यादी तपासून बघितले असता प्रधानमंत्री आवास घरकुल योजना व मोदी आवास घरकुलांची यादी काही प्रमाणात रद्द झाली आहे.

           दोन्ही योजनाची बेरीज जवळपास 36 हजार 698 आहे. म्हणजे 36 हजार 698 घरकुल लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असतांना वर्धा जिल्ह्यातील नागरिक घरकुलांपासून वंचित ठेवण्यात येत आहेत हे आमदार समीर कुणावार यांच्या लक्षात आले.

        आमदार समीर कुणावार यांना संशय आला की वर्धा जिल्ह्यात 36 हजार 698 लाभार्थी उद्दिष्ट असून,जिल्ह्यात केवळ 14 हजार 865 घरकुलांचे उद्दिष्ट पुर्ण झाले आहे व २२ हजार घरकुलांचे उदिष्ट बाकी आहे.

         आमदार समीर कुणावार स्वतः सहकार मंत्री श्री.अतुल सावे यांची भेट घेतली आणि यांना निवेदनान्वये वर्धा जिल्ह्यामध्ये मोदी आवास योजना अंतर्गत सन 2023/24 मध्ये 36 हजार 898 लाभार्थ्यांची यादी प्रलंबित आहे.सर्व सामान्य नागरिकांना जास्त घर मिळावे अशी मागणी रेटून धरली.

            ना.अतुल सावे यांना घरकुल उदिष्ट पुर्ण करण्यासाठी आमदार समीर कुणावार यांनी विनंती केली असता,ना.अतुल सावे यांनी सकारत्मक भूमीका घेऊन तातडीने चौकशी करू व घरकुलाचे उद्दिष्ट वाढवून देण्याबाबत होकार दिला.

          आमदार समीर कुणावार जनहितार्थ सक्रिय झाले असून त्यांचे समाजहितपोयोगी कार्य तिव्र गतीने सुरु आहे..