युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर शहरात होणाऱ्या पालिका निवडणुकीसंबंधी गप्पा आणि राजकारण सध्या गुलाबी थंडीमध्ये रंगत आहेत. दर्यापूर नगरपरिषदेच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी पार पडणार असून, नामांकन प्रक्रिया आज (10) सुरू झाली असून. यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर आहे.
निवडणूक आयोगाने मतदानाच्या तयारीला सुरुवात केली असून, उमेदवारांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये उत्साह आणि चैतन्य अधिक दिसत आहे. सरकारी पातळीवर देखिल निवडणुकीसाठी बैठकांचे आयोजन आणि आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे.
दर्यापूर निवडणुकीत राजकीय गट आणि उमेदवार आपापले राजकीय संबंध वाढवण्यासाठी तयार असून, निवडणूक आयोग निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पडण्यासाठी प्रयत्न करीत आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय चर्चा, मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यक्रम आणि सामाजिक कार्य वाढले आहे.
स्थानिक राजकारण्यांमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांचे विजयी होण्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत तर गुलाबी थंडी वाढली असून विविध चौफुल्यांवर निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत.



