माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडून सिरोंचा तालुक्यात शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमावरून येताना झालेल्या अपघातातील मृत व जखमीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत..!! — राज्य सरकार तर्फे लवकरच मोठी मदत मिळवून देण्याची राजेंनी दिली ग्वाही..!!

    रमेश  बामणकर

अहेरी तालुका प्रतिनिधि 

सिरोंचा तालुक्यातील चिटूर येथे महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजीत शासकिय योजनांची जत्रा कार्यक्रमावरून परत येताना रंगधामपेठा जवळील दुबापल्ली येथे 26 एप्रिल बुधवारी टॅक्टर ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात लक्ष्मीदेवपेठा येथील तीन जण ठार तर 26 जण जखमी झाले होते. मृतात दोन महीला व एका पुरुष व्यक्तीचा समावेश होता. या अपघातातील तीन मृत व सव्वीस जखमिंच्या कुटुंबीयांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी त्यांची आस्थेने विचारपूस करीत आर्थिक मदत केले.

      अपघातात मृत व जखमी कुटुंबीयांची आर्थिक स्थिती हलाखीची असुन गंभीर जखमींना तेलंगणा राज्यातील रुग्णालयात भरती करण्यात आले. अपघातातील मृत व जखमी कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र अजुनही ही मदत मिळाली नाही. माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना ही बाब कळताच त्यांनी दिनांक ०९ मे मंगळवारी लक्ष्मीदेवपेठा येथे प्रत्यक्ष जाऊन मृत व जखमी कुटुंबीयांची भेट घेतली व लक्ष्मीदेवपेठा ग्रामपंचायत कार्यालयात मृत व जखमी कुटुंबीयांना मदतीची रक्कम सुपूर्द केली. व मृत कुटुंबीयांची व जखमी रुग्णांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन राजेंनी दिले. व यानंतर शासकिय कार्यक्रम आयोजीत करताना नागरिकांची उचित काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानंतर त्यांच्या उपचारासाठी प्रशासकीय व्यवस्थेचे अंकिसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. राजे अम्ब्रिशराव आत्राम हे वेळोवेळी संकटात धावून येतात त्याचा प्रत्यय यावेळी पुन्हा एकदा आला असुन दिलेल्या मदतीबद्दल मृत व जखमींच्या कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.

         यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सोबत सिरोंचाचे नायब तहसीलदार सय्यद साहेब, आरडाचे माजी सरपंच रंगू बापू, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव संदीप राचर्लावार, माजी सरपंच चंद्रय्या सदनापू, भाजपा तालुकाध्यक्ष शंकर नरहरी, तालुका महामंत्री माधव कासर्ला, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सतीश पदमाठींटी, जिल्हा मोर्चा सचिव दिलीप सेनिगारापू, संतोष पडालवार, तालुका उपाध्यक्ष भास्कर गुडीमेडला, वसंत डूरके, ज्येष्ठ नेते गजानन कलाक्षेपवार, तालुका महामंत्री श्रीनाथ राऊत, देवेंद्र रंगू, श्रीकांत शुगरवार, सोशल मीडिया प्रमुख सागर मुलकाला, श्याम बेज्जानी, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!