दर्शनीय फलक लावण्याबाबत तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्याबाबत…

चेतक हत्तीमारे 

  प्रतिनिधी

   साकोली:- भंडारा जिल्ह्यातील साकोली बस स्थानक हे मध्यवर्ती बस स्थानक असून उद्घाटन झाले तेव्हापासून बस क्रमांक बस स्थानकाचे दर्शनीय फलक बस स्टँडच्या प्रवासी बसतात त्यांच्या वरील भागात ते फलक दिसेनासे झाले आहेत बाहेरील आलेल्या प्रवासांना तसेच नवीन चालक व वाहक यांना बस स्टँड दिसेनासे असल्यामुळे साकोलीचे बस स्टॅन्ड कोठे आहे विचारले आहे त्यामुळे बस स्थानकाच्या दर्शनीय फलक नवीन करण्यात यावा जेणेकरून साकोली हे मध्यवर्ती बस स्टॅन्ड ओळखले जाईल तसेच पूर्वीपेक्षा यावर्षीच्या क** उन्हाळा असल्याने बस स्टैंड वर वरील प्रवाशांना साधा प्याऊ तर दिसतच नाही पण पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही बस स्टॅन्ड असलेली थंड पाण्याची मशीन मध्ये पाणी नसल्यामुळे प्रवासांना उन्हाळ्यात पाण्यासाठी हाल सहन करावे लागत आहे तरी लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करावी असे प्रवासी जनतेची मागणी असून राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी माननीय प्रभाकर सपाटे सुरेश सिंग बघेल सुरेश बोरकर राजू हटवार मोहन बोरकर जागेवर कुंबरे दीक्षित रामटेके व इतर कार्यकर्त्यांनी आगार प्रमुख यांना निवेदनाद्वारे कळविले आहे अन्यथा प्रवासी जनतेला संबंधित कार्यालयाच्या समोर धरणे करावे लागेल