महिला समुपदेशन केंद्र साकोलीच्या वतीने भावेश कोटांगले यांचा सत्कार….

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

         साकोली -आज महिला समुपदेशन केंद्र साकोलीच्या वतीने एकोडी ग्रामपंचायत मध्ये नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल महिला समुपदेशीका इंद्रायणी कापगते यांनी आपल्या कार्यालयात भावेश कोटांगले यांचा सत्कार केला.

     भावेश हे कार्यालयात महिला समुपदेशन करीत असतात , व योग्य न्याय मिळवुन देण्याचे काम करीत आहेत, बरेच महिलांना मार्गदर्शन करून स्त्री पुरुष समानता राहिली पाहिजे , कुटूंब उध्वस्त होऊ नये यासाठी नेहमी समुपदेशन करीत असतात हे विशेष म्हणून समुपदेशन केंद्रा तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. 

         त्यावेळी महिला समुपदेशिका इंद्रायणी कापगते, भूमिता धकाते, नामदेव कापगते, खेमराज कापगते, मनोज कोटांगले, कार्तिक मेश्राम, एकनाथ मेश्राम उपस्थित होते.