Home Vidarbha आंबोली येथील घटनेशी संबंध नाही :- शुभम मंडपे…

आंबोली येथील घटनेशी संबंध नाही :- शुभम मंडपे…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

शंकरपूर : आंबोली येथे पकडण्यात आलेले ट्रॅक्टर ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी परस्पर सोडले. यात आपला कोणताही संबंध नसताना राजकीय वैमनस्यातून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न दिसून आला आहे,असे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे यांनी म्हटले आहे.

          तर, ग्रामपंचायत आंबोलीच्या माध्यमातून आम्ही विविध विकासकामे, उपक्रम, योजनांची अंमलबजावणी आम्ही केली. आणि त्यामुळे राजकीय वैमनस्यातून किंवा येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका समोर ठेवून काही विघ्नसंतोषी लोकांच्या माध्यमातून, काही वार्ताहरांना हाताशी धरून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत,असे उपसरपंच वैभव बाबा ठाकरे यांनी म्हटले आहे.

          दरम्यान, वाकर्ला साझाचे तलाठी समाधान मुंडे यांनी अशी कुठलीही घटना घडली नसल्याची माहिती त्यांनी दिली.यामुळे तलाठी मुंडे यांच्या मतानुसार मुरुम अवैध उत्खननाची घटना खोटी असल्याचे दिसून येते.