सुमेध बुद्ध विहारात भव्य आरोग्य मेळावा व रक्तदान शिबिर संपन्न…

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

साकोली -सुमेध बुद्ध विहार एकोडी येथे मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती निमित्ताने भव्य आरोग्य मेळावा व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

      सुरुवातीला महाकरूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीबा ज्योतिबा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले. 

  कार्यक्रम प्रसंगी स्टेज बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर गजभिये, पोलीस चौकी इंचार्ज नवनीत जांभुळकर, उपसरपंच रिगण राऊत, ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, वैभव खोब्रागडे, सुकराम बन्सोड,कुंदा जांभुळकर, आशा बडवाईक, तंटा मुक्ती अध्यक्ष अनिरुद्ध समरीत, कमलाकर चांदेवार उपस्थित होते.

     आरोग्य शिबीर मध्ये जिल्हा रुग्णालया मधील त्वचारोग तज्ञ डॉ. शब्बीर शेख, बालरोग तज्ञ डॉ.भुवनेश्वर भोंगाडे, फिजिशियन डॉ.इशांत कुरंजेकर,दंतचिकित्सक रुपचंद भेंडारकर, डॉ.शैलेश कुकडे, डॉ.गौरी तुकादम, उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य चमू, जिल्हा रुग्णालयातील आरोग्य चमू, रक्तपेडी संकलन चमू, प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी येथिल आरोग्य टीम उपस्थित होते.

      शिबिरामध्ये 300 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली व सोबतच औषधे वाटप करण्यात आली तर रक्तदान 20 लोकांनी केले.

        आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी मनोज कोटांगले, कार्तिक मेश्राम, सुबोधकांत कोटांगले, फिरोज कोटांगले, सुसेन्द्र मेश्राम, हुसेन मेश्राम, सित्तम ईलमकार, संदीप आदमने, एकनाथ कोटांगले, निरोज मेश्राम, कैलाश जांभुळकर, सुखराम जांभुळकर, आशा वर्कर कृपा भैसारे, मोहिनी कोटांगले, तेजस कोटांगले, साहिल उके, रुपेश कोटांगले, ,भोजराम बडोले, यांनी सहकार्य केले, 

 कार्यक्रमाचे संचालन खोब्रागडे सर , तर प्रास्ताविक भावेश कोटांगले व आभार कार्तिक मेश्राम यांनी केले.