Home Social नवजीवन कॉन्व्हेंटमध्ये ‘क्रांती दिन’ साजरा…

नवजीवन कॉन्व्हेंटमध्ये ‘क्रांती दिन’ साजरा…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (CBSE), साकोली येथे ‘आगष्ट क्रांती दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या भारती व्यास यांनी भूषविले. प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापक विनोद किरपान आणि पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर उपस्थित होते.

       कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर क्रांतिकारक भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राष्ट्रपिता महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, बिरसा मुंडा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.

            ‘आगष्ट क्रांती दिन’ या विषयावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांचे योगदान अधोरेखित केले. भावी पिढीतील विद्यार्थ्यांनी या क्रांतिकारकांचे गुण अंगीकारून देशसेवेत आपले अमूल्य योगदान द्यावे, असे आवाहन प्राचार्या भारती व्यास यांनी केले.

        या प्रसंगी नर्सरी ते केजी-2 मधील विद्यार्थ्यांनी थोर क्रांतिकारकांच्या वेशभूषेत रंगतदार सादरीकरण केले. “भारत माता की जय” आणि क्रांतिकारकांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली भगतकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.