Home Maharashtra एन.टीव्ही. न्यूज मराठीचा ‘शाही पुरस्कार’ सोहळा १२ ऑगस्ट रोजी होणार!

एन.टीव्ही. न्यूज मराठीचा ‘शाही पुरस्कार’ सोहळा १२ ऑगस्ट रोजी होणार!

   अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 

   दखल न्यूज़ भारत…

अहमदनगर :- डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे शिंदे यांच्या शुभहस्ते,तसेच प्रमुख पाहुणे पद्मश्री पोपटराव पवार,महाराष्ट्र राज्य आदर्श गाव योजना व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष आमदार 

संग्राम जगताप,(अ.नगर शहर)

सोमनाथ घार्गे पोलिस अधीक्षक,

गणेश राठोड उपजिल्हाधिकारी,

ॲड.सुभाष काकडे जेष्ठ विधीज्ञ (अहिल्यानगर न्यायालय),

विकास भोसले,DD news रिपोर्टर सातारा,सतीश सावंत संपादक दै.माणदेश नगरी सोलापूर यांच्या उपस्थितीत एन. टी. व्ही. न्यूज मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त ‘शाही पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

       या कार्यक्रमाची माहिती एन. टी. व्ही. न्यूज मराठीचे संपादक इक्बाल शेख यांनी दिली.

       हा भव्य सोहळा दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी,सकाळी ११:०० वाजता, (अहिल्यानगर)अहमदनगर येथील हॉटेल व्ही-स्टार, तारकपूर बस स्टँड शेजारी आयोजित करण्यात आला आहे.

     यावेळी विविध क्षेत्रांतील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.