Home Maharashtra निर्भिड पत्रकारी बघता तिसऱ्यांदा आशिष चेडगे भंडारा जिल्हाध्यक्षपदी निवड… — महाराष्ट्र...

निर्भिड पत्रकारी बघता तिसऱ्यांदा आशिष चेडगे भंडारा जिल्हाध्यक्षपदी निवड… — महाराष्ट्र शासन मा. प्रा. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशानुसार व सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी केली ही पुन्हा निवड…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

भंडारा : महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशान्वये भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे निर्भिड पत्रकार व दै. युवाराष्ट्र दर्शन प्रतिनिधी आशिष चेडगे यांची बेधडक निर्भिड व जनहितार्थ पत्रकारिता बघता भंडारा जिल्हा अध्यक्षपदी तिसऱ्यांदा त्यांची निवड राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी केली आहे.

         निर्भय पत्रकार आशिष चेडगे यांचीसलग तिसऱ्यांदा शासनमान्य पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र विशेष करून सोशल मिडीयातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. 

          जनतेच्या न्याय हक्कासाठी, गोरगरीब जनतेचे प्रश्न, भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे एकुण एक वृत्त आशिष चेडगे यांनी त्यांच्या वृत्तपत्रे आणि सोशल मिडीयातून प्रसारण करीत आज जनतेसमोर सत्य स्थिती आणून मांडलेली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ कसा निर्भिड पत्रकार असावा, कुणाच्याही पैशाला आकर्षित न होता बेधडकपणे त्यांनी अनेक प्रकरणे प्रकाशझोत आणली आहेत. की जे स्थानिक एका प्रसिद्ध मठ देवस्थानच्या पावती घोटाळा भ्रष्टाचाराची बातमी निर्भिडपणे छापून या एकट्यानेच साकोलीतील जनतेसमोर सत्य उजेडात आणले होते हे आशिष चेडगे यांचे उल्लेखनीय व दमदार कार्य..

        त्यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघासाठी अनेक वृतमाध्यमांतून पत्रकारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मिडीयातून प्रसारण केले होते. याचीच दखल घेत संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी आज शुक्रवार ०९ मे रोजी मुंबईहून आदेश देत राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी तिसऱ्यांदा आशिष चेडगे यांची भंडारा जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे. 

           साकोली उपजिल्हा क्षेत्रातील प्रसिद्ध निर्भिड “साकोली मिडीया” चे मुख्य संचालक व दैनिक युवाराष्ट्र दर्शन साकोली प्रतिनिधी आशिष चेडगे यांनी तिसऱ्यांदा शासनमान्य पत्रकार संघाचे भंडारा जिल्हा अध्यक्षपद कायम राखले त्याबद्दल त्यांचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, विदर्भ महासचिव शेखर बोरकर, जिल्हा सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुरज गोंडाने, भंडारा जिल्हा प्रभारी डॉ.अक्षय कहालकर, युवाराष्ट्र दर्शन भंडारा जिल्हा प्रतिनिधी विलास सुदामे, प्रा. प्रेमानंद हटवार लाखांदूर तालुकाअध्यक्ष, प्रशांत शहारे पवनी तालुका अध्यक्ष, ऋग्वेद येवले साकोली शहराध्यक्ष, सचिव मनिषा काशिवार, सदस्यगण ताराचंद कापगते, राशिद कुरैशी, रवि भोंगाणे, किशोर रंगारी, यशवंत कापगते, मदन कमाने, संपादक डी. जी. रंगारी आणि व्हीआयपी मिडीयाचे अनिल कापगते, महेश पोगळे, किशोर बावणे आदींनी आशिष चेडगे यांचे सहर्ष स्वागत करीत अभिनंदन केले आहे.