Home Social अंत्यविधी व सरपणा करीता निस्तार दरात जळाऊ लाकूड उपलब्ध करून द्या :-...

अंत्यविधी व सरपणा करीता निस्तार दरात जळाऊ लाकूड उपलब्ध करून द्या :- माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे यांची मागणी…

     राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधि

          वन आगार कूरखेडा येथे अंत्यविधी व सरपणा करीता वेळेवर जळाऊ बिट उपलब्ध होत नाही त्यामुळे नागरिकांना अडचण होते आगारात आवश्यक प्रमाणात जळाऊ बिट उपलब्ध होतील याकरीता नियोजन करावे व गोरगरिबांना निस्तार दरात उपलब्ध करून द्यावे या मागणी करीता दि ७ एप्रिल रोजी माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यानी येथील वन परिक्षेत्र कार्यालयात पोहचत वनअधिकाऱ्यांशी चर्चा व मागणी केली.

         शहर व तालूका वासीयाना अंत्यविधी क्रीये करीता वन आगारात नियमीत जळाऊ लाकूड बिट उपलब्ध असणे आवश्यक आहे वेळेवर बिट उपलब्ध न झाल्यास पूर्वीच दूखा:त असलेल्या कूटूंबाला दूख: बाजूला ठेवत लाकडा करीता भटकंती करावी लागते तसेच आगारात उपलब्ध बिटाचे प्रति बिट ३ हजार २०० रू दर असल्याने वेळेवर गोरगरिबांना ते आवाक्याचा बाहेर ठरते सदर अडचण लक्षात घेत किमान दरात किंवा निस्तार दरात ते उपलब्ध करून द्यावे तसेच सद्या युद्धा मुळे गॅस टंचाई सूरू असल्याने अनेक कूटूंबाना वेळेवर गॅस उपलब्ध होत नाही आहे.

           तसेच घरात लग्न किंवा काही अन्य कार्यक्रम असल्यास जळावू बिटाची गरज असते मात्र ते उपलब्ध होत नसल्याने त्यांची अडचण होत आहे सदर समस्या लक्षात घेत पूर्वी प्रमाणे निस्तार दरात कूटूंबाना जळावू बिट उपलब्ध करून देण्याची मागणी रविंद्र गोटेफोडे यानी वन अधिकाऱ्यांकडे चर्चेत केली यावेळी वनक्षेत्र साहायक संजय कंकडलवार यानी अंत्यविधी करीता असलेल्या बिटाचा दर कमी करण्याकरिता उपवनसंरक्षक स्तरावर मागणी सह ठराव पाठविण्याची सूचणा केली व मागील दोन वर्षांपासून निस्तार दरात आगारात जळाऊ बिट उपलब्ध नाहीत मात्र यावर्षी कूप कटाईचा नियोजन आराखड्याला मंजुरी मिळाली आहे.

        पूढील १२ वर्षाचा आराखडा तयार करण्यात आला आहे जगंल कामगार सहकारी संस्था मार्फत कूप कटाईचा कामाला सुरुवात होणार असल्याने पूढील वर्षांपासून कूटूंबाना निस्तार दरा प्रमाणे जळावू बिट कूरखेडा आगारात उपलब्ध राहतील असे सांगितले याप्रसंगी वनरक्षक एम के दूधबळे हे सूद्धा हजर होते.