Home Maharashtra खत विक्रीमध्ये आढळली तफावत,गडचिरोली कृषी अधिकारी भरारी पथकाचे कुरखेडा येथील दोन कृषी...

खत विक्रीमध्ये आढळली तफावत,गडचिरोली कृषी अधिकारी भरारी पथकाचे कुरखेडा येथील दोन कृषी परवानाधारक दुकानदारांना खत विक्री बंद आदेश जारी… — भरारी पथकाद्वारे तपासणी मध्ये एका शेतकऱ्याला वीस युरिया बॅग दिली असल्याची माहिती समोर…

     राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

          सध्या रब्बी हंगामात कुरखेडा तालुक्यात खत विक्रीत काळाबाजार होत असल्याची खमंग चर्चा चालू असताना आज गडचिरोली कृषी अधिकारी व कुरखेडा येथील तालुका गुण नियंत्रक अधिकारी यांच्या भरारी पथकाच्या संयुक्त विद्यमाने कृषी परवानाधारक दुकानांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात खत विक्री मध्ये काळाबाजार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र कृषी केंद्र कुरखेडा व सोनकुसरे कृषी केंद्र कुरखेडा या दोन परवानाधारक कृषी केंद्र धारकांना खत विक्री बंद आदेश दिला आहे.

             रब्बी हंगामात धान्य व मका पीक उत्पादक शेतकऱ्याना युरिया साठी मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागत होती अशातच बरेच शेतकऱ्यांना एक ते दोन बॅग युरियावर समाधान मानावे लागत होते परंतु आपल्या जवळच्या शेतकरी बांधवांना 20 युरिया बेग दिली असल्याची माहिती समोर आली आहे, कोणाला उपाशी तर कुणाला तुपाशी असा भेदभाव कृषी केंद्र चालक करीत असल्याची चर्चा सुद्धा रंगली होती . अशातच आज कुरखेडा तालुक्यात कृषी परवानाधारक यांची तालुका गुण नियंत्रक निरीक्षक तथा कृषी अधिकारी गडचिरोली येथील तपासणी भरारी पथकाने तपासणी केली असता महाराष्ट्र कृषी केंद्र कुरखेडा व सोनकुसरे ऍग्रो एजन्सी कुरखेडा यांची कृषी गुण नियंत्रक निरीक्षक यांनी तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली असून एकाच शेतकऱ्यास जास्त दराने युरिया बॅग देणे , इ पास व प्रत्यक्षात साठा न जुडणे ,नियमित विक्री अहवाल सादर न करणे साठी व युरिया खत तपावत आढळून आल्याने एकूण ३२ . ७१५ टन खतास विक्री बंद आदेश देण्यात आले आहे.

          तसेच कृषी परवानाधारक यांनी नियमित अहवाल सादर करावा तसेच एकाच शेतकऱ्यास जास्त बॅग विक्री करू नये तसेच प्रत्यक्षात साठा व ईपास वरील साठा याचा ताडमेळ ठेवावा जादा दराने खत विक्री करू नये खताची लिंकिंग करू नये अशी ताकीद गुण नियंत्रक निरीक्षक संजय रामटेके यांनी सर्व परवानाधारक दुकानदारांना दिलेली आहे.

          भरारी पथकामध्ये गडचिरोली कृषी विकास अधिकारी किरण खोमणे आरमोरी तालुका गुण नियंत्रक अधिकारी योगेश रणदिवे, वडसा येतील शितल खोब्रागडे व गडचिरोली येथील येरने यांच्या भरारी पथकाने कार्यवाही केली आहे. 

         महाराष्ट्र कृषी केंद्र कुरखेडा व सोनकुसरे कृषी केंद्र कुरखेडा यांना खत विक्री बंद आदेश दिल्याने परवानाधारक कृषी केंद्र संचालकांमध्ये एकच खळबळ माजली आहे.

           या संदर्भात महाराष्ट्र कृषी केंद्र संचालक भरत भट्टड यांना विचारणा केली असता यावेळेस मका पीक व धान्य पिक यांची हवामान अंदाज मुळे पिकांची वाढ होऊ शकली नाही त्यामुळे बरेच शेतकरी बांधवांनी युरिया खत दोन-चार वेळ खरेदी केली आहे असे सांगितले.