Home Maharashtra ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अवैध वाळू,मुरुम,वाहतूक करणारी वाहणे जप्त करण्याबाबत पत्रकार विलास...

ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अवैध वाळू,मुरुम,वाहतूक करणारी वाहणे जप्त करण्याबाबत पत्रकार विलास मोहिनकर यांचे चिमूर तहसीलदार यांना निवेदन… — तहसील कार्यालयाच्या समोरुन वाळू व मुरुमांची चोरटी वाहतूक होत असताना कारवाई होत नसल्याचा उपस्थित केला प्रश्न.

    उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक..

       चिमूर तालुकातंर्गत वाळू व मुरुमांचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या सहकार्याने वाळू व मूरुमांची चोरटी वाहतूक बंद करण्याची,वाहणे जप्त करण्याची,फौजदारी कारवाई सह दंडात्मक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे चिमूर तालुका संघटक पत्रकार विलास मोहिनकर यांनी,चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

         पत्रकार विलास मोहिनकर यांनी निवेदनात म्हटले आहे की,ट्रॅक्टर,ट्रक,हायवा,मिनी ट्रक,१२ चाकी वाहनाद्वारे वाळू व मूरुमांची चोरटी वाहतूक चिमूर तहसील कार्यालयाच्या समोरुन होत आहे.

           चोरट्या वाळू व मूरुम वाहतूकीमुळे करोडो रुपयांचा महसूल बुडाला असून याला जबाबदार कोण?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.याचबरोबर चिमूर महसूल विभाग वाळू,मुरुम अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.

           उमा नदीच्या मौजा उसेगाव,मौजा सोनेगाव (गावंडे), व चिमूर नदी पात्रातून आणि इतर नदी पात्रातून नेहमी वाळूची चोरी होत असताना ग्राम महसूल अधिकारी हे अवैध चोरट्या वाळू वाहतूकीला आळा घालण्यासाठी अयशस्वी ठरले आहेत असे पत्रकार विलास मोहिनकर यांचे म्हणणे आहे.

          याचबरोबर त्यांनी निवेदनात आरोप केला आहे की,रुपये देऊन वाळू व मूरुमांची चोरटी वाहतूक केली जात आहे.यामुळे चोरट्या वाळू व मूरुम माफीयांचा बंदोबस्त करण्यासाठी व महसूल बुडविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्याकडे,पत्रकार विलास मोहिनकर यांनी केली आहे.