Home Social “टीएआयटी” परीक्षेत शिक्षण शास्त्रातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी. —...

“टीएआयटी” परीक्षेत शिक्षण शास्त्रातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी. — टीएआयटी परीक्षा मे-जूनमध्ये होण्याची शक्यता :- अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना सतावतेय भीती…

ऋषी सहारे 

  संपादक

शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेकजण डीएड, बीएडचे प्रशिक्षण घेत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात जवळपास हजारो विद्यार्थी डीएड, बीएडच्या अंतिम वर्षाला आहेत. या पार्श्वभूमीवर मे-जून महिन्यांत टेट परीक्षा होण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत. मात्र, असे झाल्यास डीएड, बीएडच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना या टेट परीक्षेपासून मुकावे लागणार आहे.

          डीएड, बीएडचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षक बनण्यासाठी टेट (टीएआयटी) परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. यातील मेरीट लिस्टनुसार शिक्षक भरतीसाठी निवड केली जाते. मागील दहा ते बारा वर्षांनंतर मागील दोन वर्षांपूर्वी अशी टेट परीक्षा झाली होती. त्यातून अनेकांची शिक्षक म्हणून निवड झाली.

       आता हीच टेट परीक्षा मे-जून महिन्यांत होण्याचे संकेत आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी डीएड, बीएडच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत आहेत. त्यांची परीक्षा व निकाल हा जून महिन्यात लागू शकत नाही. त्यामुळे त्यांना टेट परीक्षा देता येणार नाही. त्यानंतर ही परीक्षा पुन्हा केव्हा होणार, याची शाश्वती नाही.

        त्यामुळे अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना टेट परीक्षा देण्याची संधी द्यावी, अशी मागणी अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली तसेच शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्फत शिक्षणमंत्र्यांना, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्ष व आयुक्तांना निवेदनातून केली आहे.

शिक्षणमंत्र्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्ष व आयुक्तांना पाठवले निवेदन…

           मे-जूनमध्ये टेट परीक्षा होण्याचे वृत्त काढताच डीएड, बीएड अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना आपण टेटपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी शिक्षक भरतीसाठी आवश्यक टेटची जाहिरात ही डीएड, बीएडचा अंतिम निकाल लागल्यावरच काढावी, नाहीतर सीटीईटी किंवा टीईटीसारखे डीएड, बीएडच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना टेट देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिक्षणमंत्र्यांना, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्ष व आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

        यावेळी शुभम पाटील, आदित्य भांडेकर, हेमंत जवंजाळकर, सूरज पाल, कामिनी कुनघाडकर, काजल अगडे आदी उपस्थित होते.

शासकीय प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सह सर्व खासगी आस्थपनात होणार भरती….

         राज्यातील शासकीय तथा स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जातात. सन २०१७नंतर २०२२ साली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता मे आणि जून महिन्यात टीएआयटी परीक्षा घेण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केली आहे. 

टीईटी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना संधी…

        टीएआयटी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच शिक्षक पदासाठी भरती केली जाते. यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पहिला आणि दुसरा पेपर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची अनुक्रमे इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी निवड केली जाते. तसेच इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षक पदांसाठी टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक नाही.

टिएआयटी टेट परीक्षा म्हणजे नेमक काय?

        टेट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा या परीक्षांच्या माध्यमातून शासकीय प्राथमिक माध्यमिक व सर्व खाजगी आस्थापनातील शाळेमध्ये शिक्षकांची नियुक्ती होती यामध्ये प्रामुख्याने विना मुलाखती व मुलाखत सह शिक्षकांची निवड करण्यात येणार.

विना मुलाखात सह होणारी भरती…

 १ली ते ५ वी

 ६ वी ते ८ वी  

मुलाखत सह होणारी भरती खासगी अस्थापना

 ९ वी ते १२ वी 

मुलाखत सह (एसओपी) प्रणाली च्या माध्यमातून भरती प्रक्रिया पार पाडली जाते.

शासनाकडून परीक्षेविषयी लवकरच अधिसूचना…

         टीएआयटी परीक्षेचे आयोजन मे आणि जून महिन्यात होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.

परीक्षेविषयी सविस्तर अधिसूचना २ लवकरच प्रसिद्ध केली जाईल. पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरू ठेवावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

अनेक विद्यार्थी संघटनांच्या वतीने शासनाकडे मागणी…

१)डीएड, बीएडच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांनी बहुतांश प्रशिक्षण पूर्ण केल्याने परीक्षेसाठी आवश्यक ते ज्ञान विद्यार्थ्यांकडे आहे. त्यातच मागील काही वर्षांचा विचार केल्यास भविष्यात टेट (टीएआयटी) केव्हा होणार, याची शाश्वती नाही. त्यामुळे डीएड, बीएडचा अंतिम वर्षाचा निकाल लागल्यावर परीक्षा घ्यावी किंवा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी द्यावी, कोणत्याही विद्याथ्यांवर अन्याय होऊ देऊ नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

२)सामान्य प्रशासन विभाग परिपत्रकानुसार वयोमर्यादामधून बाद होणाऱ्या उमेदवारांना एक वर्षाची सुट देण्यात यावी.

३) टेट २०२२ परीक्षा बाबत आयबीपीएस कंपनी मार्फत कमी वेळेत सूचना दिलेल्या केवळ २४ दिवसात परीक्षा घेतल्याने अनेक उमेदवारांना पुरेशी तयारी करण्यासाठी वेळ न मिळाल्याने उमेदवार गोंधळून गेले होते. परीक्षानंतर अनेक कोर्टात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यामुळे भविष्यात परीक्षानंतर कोर्टात याचिका दाखल होऊ नयेत यासाठी योग्य ते निर्णय घ्यावेत. अभ्यासक्रम ४५ दिवस अगोदर उमेदवारांना कळवावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या.

           पूर्वी झालेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील त्रुटी दूर करून योग्य पद्धतीने आयोजन करत भविष्यात कोर्ट केस होऊ नयेत आणि भरती प्रक्रिया सुरळीत जलद पार पाडण्यात यावी म्हणून परीक्षा घेण्या अगोदर जाहिरात द्यावी,त्याची उत्तर तलिका सह प्रश्न पत्रिका वर आक्षेप मिळवण्यास संधी द्यावी डीएड बीएड CTET अध्यापक पदविका नंतर परीक्षा नियोजन करून परीक्षा फिस माफक ठेवावी सोबतच शिक्षकांची निवड करत गुणाचे नोर्मलाझेशेन करण्यात यावे.!

१० वर्ष शिक्षक भरती झालीच नव्हती.

          अतिरिक्त शिक्षक असल्याने जवळपास दहा वर्षे शिक्षक भरती झाली नव्हती. मागील दोन वर्षांपूर्वीच्या टेट परीक्षाच्या आधारावर आता शिक्षक भरती झाली.