Home Maharashtra नगर परिषद चिमूर घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पल आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने, नुकसान किती?

नगर परिषद चिमूर घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पल आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने, नुकसान किती?

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

चिमूर :- चिमूर शहरा पासून अगदी जवळच ४ किलो मिटर अंतरावर असलेल्या नगरपरिषदच्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी असल्याने त्यात खत बनविणाऱ्या सामुग्रीचे किती नुकसान झाले,या संबंधाने नगर परिषद मुख्याधिकारी सार्वजनिक रित्या आपले मत व्यक्त करतील काय?हा प्रश्न चिमूर नागरिकांना पडला आहे.

         घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला शेत वनव्यामुळे आग लागल्याची घटना आज ७ मार्च २०२५ ला दुपारी ३ वाजता नंतर घडली असल्याची बातमी चिमूर शहरात व परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

            हवेच्या साह्याने नगरपरिषदच्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाला आगीने वेढा घेतलाय.आग लागल्याची माहिती मिळताच नगरपरिषदचे अग्निशमन दल घटना स्थळी तातडीने पोहचले असून आग विझविण्याचा आटोकात प्रयत्न सुरू होता.पण आगीवर नियंत्रण आणणे जमले नसल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

       मात्र या आगीत नुकसान कसाचे झाले(साहित्याचे/सामुग्रीचे) आणि किती रुपयांचे झाले हे अजूनही समोर आले नाही.

     घनकचरा प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी असताना तेथील स्थानिक कर्मचारी काय करीत होते,हा मुद्दा सुध्दा तितकाच महत्त्वाचा आहे.