Home देशविदेश इतर मुद्दांसह एव्हिएम मशिन च्या विरोधात भारत मुक्ती मोर्चा द्वारे जेल भरो...

इतर मुद्दांसह एव्हिएम मशिन च्या विरोधात भारत मुक्ती मोर्चा द्वारे जेल भरो आंदोलनाला देशभरातून सुरुवात… — “ए आजादी झुठी है,देश की जनता भुखी है।,”वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा।,”सत्ताधारी जब जब अत्याचार करते है,तब तब पुलिस को आगे करते है।देश के कोने कोने में गुंज रहे हैं नारे। — नागरिकांचे संरक्षण आणि विकास करण्यास अयशस्वी ठरलेले सत्तापक्ष त्यांचे हक्क नाकारण्याचा कट विविध देशद्रोही आणि संविधानद्रोही कायदे तयार करून करीत आहेत.

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

          ईव्हीएम मशिन द्वारे मनुवादी तथा ब्राह्मणवादी विचार सरणीचे खासदार आणि आमदार निवडून आणले जातात व त्यांच्या माध्यमातून भारत देशातील ओबीसी,एससी,एसटी-एनटी,अल्पसंख्याक बहुजन समाजाच्या नागरिकांवर सत्तेच्या बळातंर्गत अन्याय-अत्याचार,करण्याची कार्यपध्दत भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांद्वारे सातत्याने सुरु झाली असल्याचे लक्षात येते आहे.

        याचबरोबर देशातील बहुसंख्य नागरिकांचे सत्तेच्याआड भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांद्वारे बिनधास्त शोषण केल्या जात आहे.याला कारणीभूत,”ईव्हीएम मशिन द्वारे घेण्यात येणाऱ्या निवडणूका आहेत,असे स्पष्ट मत भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचे आहे.

          यामुळे ईव्हीएम मशिन द्वारे घेण्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकाल,”ईव्हीएम मशिन द्वारा, पाहिजे तसा निकाल आपल्या बाजूने लावल्या जातो आहे.ईव्हिएम मशिन म्हणजे आधुनिक मनुस्मृती आहे.म्हणूनच या देशातील मुठभर मनुवादी तथा ब्राह्मणवादी लोक या देशातील नागरिकांना चांगल्याप्रकारे जगू देत नाही,त्यांचे हक्क त्यांना देत नाही,देशातील नागरिकांच्या विरोधात संविधान द्रोही म्हणजेच लोकद्रोही कायदे तयार करून त्यांच्यावर(देशातील नागरिकांवर) विविध प्रकारचे निर्बंध लावण्याचे काम भाजपा आणि काँग्रेस समर्थीत राज्यसत्ता काळात सुरु झाले आहे.

         म्हणूनच भारत मुक्ती मोर्चा द्वारे देशद्रोही आणि संविधानद्रोही केंद्र सरकारचा,(भाजप समर्थीत केंद्र सरकार म्हणजे भारत सरकार) आणि विविध राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी व त्यांच्या लोकविरोधी धोरणांना नागरिकांसमोर आणण्यासाठी आज म्हणजे ९ एप्रिल २०२५ रोज मंगळवारला देशभरात जेल भरो आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

      “ए आजादी झुठी है देश की जनता भुखी है।,वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा।, सत्ताधारी जब जब अत्याचार करते हैं तब तब पुलिस को आगे करते हैं।,आणि इतर गगनभेदी नारे आज भारताच्या धर्तीवर गुंजू लागली आहेत.

            “आम्ही न्याय मागू कुणाला, भारतातील न्यायव्यवस्था ही उच्चवर्णीयांची म्हणजेच ब्राह्मण बनियांची बटलीक झाली,असे चित्र भारतीय न्याय व्यवस्था अन्वये पुढे येवू लागले असल्याने भारतीय न्यायव्यवस्थेवरुन देशातील नागरिकांचा विश्वास हळूहळू उडाला आहे.

            भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून न्याय भुमिका न बजावणारे न्यायमूर्ती भारतीय नागरिकांनी अनुभवले आहेत.मग,अयोध्या “बाबरी मस्जिद विध्वंसक बाबतीतील घटनाबाह्य निर्णय हो,अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षण बाबतीतील घटना द्रोही निर्णय हो,किंवा ईव्हीएम मशिन च्या बाबतीतले विविध प्रकारचे निर्णय हो,हे सर्व निर्णय उच्चवर्णीयांच्या बाजूने लावल्या गेले आहेत आणि त्यांचे निरंतर संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाद्वारे निर्णय आले आहेत असे भारतीय बहुजन समाजाच्या वतीने म्हटले गेले आहे.

           एकंदरीत भारतीय सत्ताधाऱ्यांवरील,भारतीय प्रशासनावरील आणि भारतीय न्यायव्यवस्था वरील विश्वासच बहुजन समाजातील नागरिकांचा उडाला आहे असे चित्र निर्माण झाले आहे.

          ज्या देशातील न्यायव्यवस्था नागरिकांचे सर्वोच्च हित जपू शकत नाही,नागरिकांचे सर्वोच्च संरक्षण/रक्षण करु शकत नाही,अशी न्यायव्यवस्था स्वतःच भ्रष्ट आहे आणि द्वेषाने काम करणारी बहुजन समाज द्रोही आहे हे आधीच जगप्रसिद्ध साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांगून गेले आहेत.

         भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे सतर्क आणि जागरूक असलेल्यांने भाजपाचा लोकविरोधी छुपा चेहरा आणि त्यांचा लोक विरोधी,पण लोकांनाच न समजणारा भाजपाचा  एजेंडा वारंवार उघडा करीत आहेत.याचबरोबर या देशातील जागरूक नागरिक सुध्दा भाजपचे लोकविरोधी मनसुबे हानून पाडीत आहेत.

          भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी मनुवाद/ब्राह्मणवाद विरुद्ध बहुजन वाद विचारांचे महत्त्व देशातील नागरिकांना वारंवार समजावून सांगितले आहेत, समजावून सांगत आहेत.परंतू जातीच्या आणि धर्माच्या चौकटीत अडकलेला बहुजन समाज,”स्वतः च्या शक्तीला,स्वतःच्या हक्कांना,स्वतःच्या भविष्याला,त्यांच्या विरोधातील राजकीय मुत्सद्दीपणाला आणि आपले कोण? या अनुषंगाने ओळखण्यात कमी पडतो आहे.

         म्हणूनच भाजपा आणि काँग्रेस पक्षाचे खासदार व आमदार हे सत्तेच्या बळावर बहुजन समाजाच्या विरोधात घटना द्रोही कायदे तयार करीत आहेत,बहुजन समाजांवर परत बंधने लादत आहेत.

      भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे (देशातील बहुसंख्य बहुजन नागरिकांचे) तुमचे अधिकार,तुमचे अस्तित्व,तुमची संस्कृती,तुमचा स्वाभिमान,कायम ठेवण्यासाठी संघर्ष करीत आहेत.हे समजून घेण्यासाठी तुम्ही पुढे यायला हवे.

            मनुस्मृती,मनुवादी तथा ब्राह्मणवादी धार्मिक विचारातंर्गत गुलामगिरीमुळेच अडिच हजार वर्षे या देशातील बहुसंख्य बहुजन समाज गुलाम राहिला,अशिक्षित राहिला,अधिकारविहिन राहिला,द्वेषी बनला,मनुवादी/ब्राह्मणवादी विचारातंर्गत उचनिचतेच्या नितीनियमाने एकमेकांचा विरोधी व एकमेकांचा शत्रू झालाय,आजही आहे,हे आपण केव्हा लक्षात घेणार आहोत?हा प्रश्नच गहन आहे.

            बहुजन समाजाला परत एकदा अधिकारविहिन आणि गुलाम करण्यासाठी भाजपा द्वारे आणि त्यांच्या मित्रपक्षांद्वारे भांडवलशाहीला जोमाने चालना दिली आहे.तद्वतच कंत्राटी पद्धतीने बहुजन समाजाचे लचके करणे सुध्दा सुरू केले आहे.

       भाजपा द्वारे अंमलात आणली गेलेली भांडवलशाही कार्यपद्धतच आणि कंत्राटी कार्यप्रणालीच या देशातील बहुसंख्य बहुजन नागरिकांचे खरे दुष्यमन आहेत आणि त्यांचे भवितव्य धोक्यात आणणारे नंबर एकचे धोरणे आहेत,हे सुध्दा ओबीसी,एससी,एसटी, अल्पसंख्याक,एनटी,व्हिजेन्टी,यांनी वेळेत समजून घेतले पाहिजे.अन्यथा तुम्ही लवकरच बरबाद झालेले असाल,आणि या बाबतचे वास्तव अनुभवन्यासाठी तुम्ही जिवंत असाल असे चित्र सध्याचे दिसून येते आहे.

         मात्र,भारत मुक्ती मोर्चा द्वारे आज जेल भरो आंदोलनाला देशभरातून सुरुवात झाली आहे आणि हे आंदोलन या देशातील बहुसंख्य बहुजन नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी व त्यांचे हित जपण्यासाठी आहे,एवढे नक्की!