एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आम्ही बावडा लाखेवाडी गटातून सुनेत्रा वहिनी पवार यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून बारामती लोकसभेवर दिल्लीला पाठविणार :- जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे… — राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये वातावरण खराब करण्यासाठी व अंतर्गत खोड्या करीत आसतील तर त्याला त्याची जागा दाखवून देऊ :- आण्णासाहेब कोकाटे यांचे उद्गार…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

        जगद्गुरु संत तुकाराम महाराज सराटी मुक्कामी येथील पावन भूमी मध्यील एक निष्ठावंत कार्यकर्ता व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ओळख निर्माण केली.

         युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आचार विचार व जिद्दीच्या जोरावर तरुण कार्यकर्त्यांन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्हामध्ये मोठे संघटन निर्माण केलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा उपाअध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे, यांची राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये नावातच ताकद आणि शब्दात काम आहे.

            परंतु अजितदादा पवार साहेब गटाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्याच्या ठिकाणी निवड झाली म्हणूनच सराटी गावांसाठी अनेक विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून कामे मार्गी लावलेली आहेत.

           ग्रामपंचायतीच्या सदस्या पासून ते पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपअध्यक्ष पदापर्यंत अशी आण्णासाहेब कोकाटे यांची नवीन वाटचाल कार्यरत आहे. उप मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे यांची निवड झालेली आहे.

         मीडियाशी बोलत आसताना जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे म्हणाले की ? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी मी पक्षाच्या माध्यमातून आहोरात्र प्रयत्न करीतच आहे.

        परंतु उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सौभाग्य पत्नी सुनेत्रा वहिनी पवार या बारामती लोकसभेच्या उमेदवार म्हणून उभ्या आसल्यामुळे मी स्वतःच बावडा लाखेवाडी गटातून जास्तीत जास्त मताधिक्य आम्ही सर्व कार्यकर्ते मिळवून देणारच आहोत.

          संपूर्ण तालुक्यामध्ये गटनिहाय घोंगडी बैठकाचे आमचे सत्र चालूच आहे. आनेक जाती धर्माचे लोक अजित दादा पवार यांना साथ देण्यासाठी आमच्या सोबतच आहेत. सर्वच राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आम्ही सगळे कामाला लागलेलो आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्ण द्वारे ऊघडी आहेत. परंतु वातावरण खराब करण्यासाठी व अंतर्गत खोड्या करण्यास कोणी प्रयत्न करीत आसतील तर त्याला त्यांची जागा दाखवून देऊ, कोणीही दारा मगून येऊन पक्षांमध्ये फूट पाडण्याचा व वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नये.

          राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकनिष्ठ व निष्ठावंतांना महत्त्व आसून विकास कामांना प्राधान्य देणाऱ्यांना पक्षात मानाचे स्थान आहे. मात्र पक्षात येवून व्यक्तीगत स्वार्थ व कोणत्याही प्रकारच्या खोडसाळपणा करणाऱ्यांना जागा नसून तसा प्रकार खपवून घेतला जात नसल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे यांनी केले.

            बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारार्थ पत्रकाराची संवाद साधताना जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे बोलत होते. बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद मतदार संघामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच प्रचार दौरा काढण्यात आला होता.

           आण्णासाहेब कोकाटे बोलताना पुढे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विकासाभिमुख कार्यशैलिस अनुसरून अनेक विकासाची कामे मतदार संघामध्ये करण्यात आली आहेत.

      त्याच पद्धतीचा विकास यापुढील काळात करावयाचा असल्यास सुनेत्रा वहिनी पवार यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले.

        राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खोडसाळपणा करणाऱ्यांना पक्षात स्थान दिले जात नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची काम करण्याची पद्धती जगजाहीर असून सार्वजनिक हिताच्या कामांना प्राधान्य देणाऱ्यांना पक्षात मानाचे स्थान देण्यात येते. तसेच आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विकास कामांचाही वसा घेवून यापुढे कामे करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

         उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गट हा राज्यामध्ये मोठा असल्याने इतर पक्षाचे कार्यकर्तेही पक्ष प्रवेश करण्यासाठी धावपळ करू लागले आहेत.

चौकट

          उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तरुण कार्यकर्ता एकत्र करून पक्ष वाढविण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे यांची भरारी..