Home देशविदेश अवैध व्यवसाय,पोलिस विभाग आणि सामान्य नागरिक… — जिकडे तिकडे अवैध व्यवसायच...

अवैध व्यवसाय,पोलिस विभाग आणि सामान्य नागरिक… — जिकडे तिकडे अवैध व्यवसायच व्यवसाय!,”पोलिस विभागावरुन विश्वास उडू लागलाय… — भाग — ०२….

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

           विशेषतः अवैध धंद्याच्या संदर्भात काही ठिकाणी,काही पोलिसांकडून हप्ते घेतल्याच्या तक्रारी आणि आरोप आहेत,जिथे कारवाई न करण्यासाठी पैसे घेतले जातात.

            पण हे संपूर्ण पोलीस दलाचे चित्र नाही,अनेक पोलीस प्रामाणिकपणे काम करतात आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करतात,असे वृत्तसंस्था आणि बातम्यांच्या अहवालांमधून समोर येते. 

        मात्र,अवैध धंद्यांशी संबंध असलेले पोलीस हप्ते घेऊन अवैध धंदे चालू ठेवण्यास मदत करतात किंवा त्यांच्यावर कारवाई करत नाहीत,असे आरोप आहेत आणि हा घटनाक्रम सत्यही आहे.काही ठिकाणी तर ’60-40 पार्टनरशिप’ सारखे प्रकारही समोर आले आहेत.

          अनेकदा नागरिक थेट पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करतात किंवा सोशल मीडियावर पोलिसांकडून हप्ते घेतल्याचा आरोप करतात,असे प्रकार घडले आहेत.काही आमदारही पोलिसांकडून हप्ते घेतल्यामुळे कारवाई होत नसल्याची टीका करतात,असेही वृत्त आहे. 

         जर तुमच्या परिसरात असे घडत असेल,तर तुम्ही थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे (उदा. पोलीस आयुक्त,पोलीस अधीक्षक) तक्रार करू शकता असे सामान्य नागरिकांना सांगितले आहे.तद्वतच भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे (ACB) तक्रार करता येते असे नागरिकांना अवगत करून दिले आहे.

          परंतु सामान्य नागरिकांनी अवैध व्यवसायाबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे व एसिबीडे तक्रार दाखल केली तरीही योग्य व आवश्यक कारवाई ते करीत नसल्याने सामान्य नागरिकांचा पोलिस विभागावरुन आता विश्वास उडू लागला आहे.

            पोलिसच अवैध व्यवसायीकांचे रक्षणकर्ते म्हणून समोर येत असतील तर नागरिकांच्या सुरक्षेचे काय?हा मुद्दा अनेक प्रश्न निर्माण करतोय.हे एक दुर्दैवी वास्तव आहे की काही पोलीस हप्ते घेतात,ज्यामुळे व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

         अवैध व्यवसाय म्हणजे कायद्याने प्रतिबंधित केलेले धंदे,ज्यांच्यावर पोलीस कारवाई करतात,पण अनेकदा पोलिसांचेच काही अधिकारी यात सामील असल्याच्या तक्रारी व बातम्या समोर येतात.

         मात्र ही समस्या मोठी असून पोलीस जनतेच्या मदतीने आणि अंतर्गत तपासणीतून यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत नाही हे पोलिस यंत्रणेचे पुरते अपयश आहे.

         अवैध व्यवसाय म्हणजे काय तर कायद्याने मनाई असलेले धंदे,जसे की अमली पदार्थांची विक्री,बेकायदेशीर देशी विदेशी दारू,गावठी दारू,जुगार,मटका,मानवी तस्करी,बनावट वस्तूंची विक्री, इत्यादी.

            काही वेळा पोलीसांनी या धंद्यांमध्ये हप्ते वसुली करणे,माहिती पुरवणे किंवा स्वतःच सामील असल्याच्या घटना घडतात,ज्यामुळे कारवाईत अडथळा येतो. 

    पोलिसांची भूमिका…

       कायदा व सुव्यवस्था राखणे आहे.महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” (चांगल्यांचे रक्षण आणि वाईटांचा नाश).

  कारवाई करणे…

        अवैध धंदे करणाऱ्यांवर छापे टाकणे,त्यांना अटक करणे आणि माल जप्त करणे हे त्यांचे काम आहे.

        अवैध व्यवसायाशी संबंध असलेल्या पोलिसांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करणे,अशीही पावले पोलिस आयुक्त व जिल्हा पोलीस अधिक्षकांनी उचलली पाहिजेत. 

        पोलिसांचे काम कायदा राखणे आहे,पण काहीवेळा त्यांच्यातही गैरप्रकार होतात,ज्यावर पोलीस विभाग अंतर्गत कारवाई करतो.

          ज्या परिसरात अवैध व्यवसाय व पोलिसांची साठगाठ असा काही प्रकार घडत असल्यास,तेथील पोलिस स्टेशनचे मुख्य ठाणेदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलिस विभागाकडून अनेकदा केले जाते.

               परंतु अलिकडच्या काळात हे आव्हान फुसका बार ठरत आहे.नागरिकांनी अवैध धंद्याबाबत संबंधित ठाणेदारांना व पोलिसांना माहिती दिली तरी अवैध व्यवसायाकडे पाठ फिरवली जाते व सदर परिसराला असुरक्षित केल्या जाते असे दिसून आले आहे.स्वत:च्या आव्हानांना पोलिस अधिकारी विसरतात तेव्हा अवैध व्यवसायातंर्गत आम नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र अधिकच गंभीर झालेला असतो.

       याचबरोबर जे व्यक्ती अवैध व्यवसाय बाबत तक्रारी करतात किंवा पोलिसांना माहिती देतात त्यांनाच टार्चर करण्याचे प्रकार पोलिसांकडून व अवैध व्यवसायीकांकडून घडतात.

           यामुळे सामान्य नागरिक अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष करतात,हे पोलिस विभागाचेच अपयश आहे असेच म्हणावे लागेल.