माजी सभापती प्रवीणभैय्या माने यांनी अधिकाऱ्याला फोन करताच बाळासाहेब सुतार वस्ती येथील पाणी पिण्याचा हातपंप केला सुरु..

बाळासाहेब सुतार

   नीरा नरसिंहपुर

इंदापूर तालुका प्रतिनिधी 

         इंदापूर तालुक्यातील तरुणांचा जाणता राजा आणि तालुक्याचे भावी आमदार माजी सभापती प्रवीणभैय्या माने यांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन करताच बाळासाहेब सुतार वस्ती येथील पाणी पिण्याचा हातपंप चालू करण्यात आला.

         माजी सभापती प्रवीण भैय्या माने यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपूर्वी बाळासाहेब सुतार वस्ती येथे पाणी पिण्यासाठी हातपंप बसविण्यात आलेला आहे.तसेच पत्रकार बाळासाहेब बाबुराव सुतार यांच्या मागणीला आखेर यश आले व सर्व सुतार वस्ती आणि परिसरातील कुटुंब पाणी पिण्याचा लाभ घेत आहेत.

          पिंपरी बुद्रुक येथील सुतार वस्ती येथील पाणी पिण्याचा हातपंप बंद आहे असे माजी सभापती प्रवीण भैया माने यांना पत्रकार बाळासाहेब सुतार यांनी भेट घेऊन सांगितले आसता,लगेचच प्रवीणभैया माने यांनी पंचायत समितीतील पाणीपुरवठा अधिकाऱ्याला फोन करताच सुतारवस्ती येथील हातपंप बंद आहे,तो लगेच चालू करण्यात यावा आसे सांगितले आसता,दुसऱ्याच दिवशी शुक्रवार दिनांक 8 /12 /2023 दुपारी 3 वाजता हात पंप चालू करण्यात आला.

       याबद्दल पत्रकार बाळासाहेब सुतार परिवार यांच्या वतीने माजी सभापती प्रवीणभैया माने यांचे फोन द्वारे पत्रकार बाळासाहेब सुतार यांनी आभार व्यक्त केले.