Home Maharashtra स्वतःच्या व कंपन्यांच्या आर्थिक लाभासाठी आदिवासी व इतर शेतकऱ्यांच्या न विकलेल्या शेतजमिनी...

स्वतःच्या व कंपन्यांच्या आर्थिक लाभासाठी आदिवासी व इतर शेतकऱ्यांच्या न विकलेल्या शेतजमिनी फेरफार करणे,एक गंभीर गुन्हा… — महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस,महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे लक्ष देतील काय? — खासदार प्रतीभाताई धानोरकर,आमदार करण देवतळे,आमदार देवराव भोंगळे शोषीत व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणार काय? — घटना अभ्यासक विनोद खोब्रागडे यांनी चंद्रपूर जिल्हातंर्गत उघडकीस आणले असे अनेक प्रकरणे….

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

        शेतकऱ्यांच्या शेतजमिनी न विकताच कोळसा उत्खनन कंपन्यांना आणि चुनखडी उत्खनन कंपन्यांच्या नावावर करण्याचा सपाटा चंद्रपूर जिल्हातंर्गत सुरू आहे.

           तलाठी तप्तर अंतर्गत कोळसा व चुनखडी उत्पादक कंपन्यांच्या नावावर आदिवासी व इतर शेतकऱ्यांच्या शेतजमिनी करणारे राॅकेट चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते आहे.

            शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कंपन्यांच्या नावावर करणाऱ्या राॅकेटमध्ये तलाठी,मंडळ अधिकारी,तलाल,कंपनी संचालक,कंपनी व्यवस्थापन व इतर अधिकारी असल्याची खात्री असल्याचे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

       याचबरोबर तलाठी,मंडळ अधिकारी,दलाल,कंपनी संचालक,संबंधित कंपनी व्यवस्थापक,यांनी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी विक्री द्वारे न घेताच तलाठी रेकॉर्डला शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा संबंधित कंपनीच्या नावावर केलेला फेरफार हा एक छडयंत्राचा भाग असून चंद्रपूर जिल्हातंर्गत जिवती तालुक्यातील मौजा कुंसुंबी व भद्रावती तालुक्यातील मौजा बरांज मोकासा येथील शेतकऱ्यांसी धोखाधाडी करणे व त्यांची फसवणूक करणे सारख्या गंभीर प्रकरणांमध्ये मोडते आहे.

          तरीही चंद्रपूर जिल्हाधिकारी,संबंधित उपविभागीय अधिकारी,भद्रावती व जिवती येथील तहसिलदार हे चुप कसे काय आहेत?हा गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे.

          तद्वतच चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या संबंधाने व इतरांच्या संबंधाने विशेष चौकशी का म्हणून केली नाही? आणि संबधित सर्व गुन्हेगारांवर फौजदारी कारवाई का म्हणून केली नाही? तलाठी व मंडळ अधिकारी यांना घरी का म्हणून बसवले नाही?त्यांचा चौकशी अहवाल महाराष्ट्र राज्याच्या महसूलमंत्र्यांना का म्हणून पाठविले नाही? असे अनेक मुद्दे चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांवर शंका निर्माण करणारे आहेत.

           चंद्रपूर जिल्हातंर्गत जिवती तालुक्यातील मौजा कुसूंबी येथील २४ आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर मागिल ४२ वर्षांपासून में मानीकगढ सिमेंट कंपनी व आताची अल्टाटेक सिमेंट कंपनी अवैधरित्या चुनखडीचे उत्खनन करीत आहे,व बोगस फेरफार करून गावठण जागेसह गाव ताब्यात घेतले आहे,हे संबंधित तलाठी,मंडळ अधिकारी,तहसीलदार,उपविभागीय अधिकारी,चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना कसे काय दिसत नाही?

          याचबरोबर चंद्रपूर जिल्हातंर्गत भद्रावती तालुक्यातील मौजा बरांज मोकासा येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी,में कर्नाटक एम्टा कंपनी बेंगलोर व में कर्नाटक पावर कार्पोरेशन प्रायव्हेट कंपनी बंगलोर,तसेच बेलोरा येथील में अरबिंदो कंपनी हैदराबाद लिमिटेड या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या कोळसा उत्खनन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा बोगस फेरफार बिनधास्त करीत आहेत,याबाबत सुध्दा चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधित अधिकारी व कर्मचारी मुंग गिळून गप्प बसले आहेत.

             जिवती तालुक्यातील मौजा कुसूंबी,व भद्रावती तालुक्यातील मौजा बरांज मोकासा,मौजा बेलोरा येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा बोगस फेरफार करणारे तलाठी,मंडळ अधिकारी यांच्यावर वरिष्ठ अधिकारी कारवाई का म्हणून करीत नाही?…

       म्हणूनच प्रश्न हा पडतो की,संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे कान बहिरे झाले आहेत काय? त्यांचे डोळे दृष्टीहिन झाले आहेत काय?त्यांना बोलता येत नाही काय? ते अधिकाराचा दुरुपयोग करीत आहेत काय? ते जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत काय? ते अधिकाराचा योग्य उपयोग का म्हणून करीत नाही? त्या सर्वांचा संबंध बोगस फेरफार प्रकरणात आहे काय?

        घटना अभ्यासक तथा तलाठी विनोद खोब्रागडे शेतकऱ्यांच्या हितासाठी व संरक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांसह कायदेशीर लढा देत आहेत.पण,या कायदेशीर लढ्याला अधिकारी वेळत समजून घेत नसल्याचे दिसून येत आहे.

         यामुळे वेळेत शेतकऱ्यांना न्याय न देणाऱ्या अधिकाऱ्यांत सरंजामशाहीचे व हुकुमशाहीचे गुण आहेत असे म्हणायचे काय?

          लोकप्रतिनिधी म्हणून खासदार प्रतीभाताई धानोरकर,आमदार किरण देवतळे,आमदार देवराव भोंगळे हे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व शेतजमिनीचा बोगस फेरफार करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी पदाचा सदोपयोग करतील काय?हा प्रश्न सुध्दा महत्वाचा आहे….

          चंद्रपूर जिल्हातंर्गत शेतजमिनी बाबतचे बोगस फेरफार प्रकरणे गंभीर असल्याने या प्रकरणाकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,व महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे हे लक्ष देणार काय? आणि अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्यायातंर्गत दिलासा देतील काय? या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील शोषीत शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.