Home शैक्षणिक ग्रामगीता महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

ग्रामगीता महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी…

       चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालयातील विद्यार्थिनी,गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली मधून बी.एस्सी.मध्ये कु.प्रांजली कैलास कामडी व कु.धनश्री संजय वरघणे क्रमशः चौथी व पाचवी मेरिट आल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ. सुनंदा आस्वले यांच्या हस्ते त्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

      तसेच महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी,कु.रोहिणी सुधाकर पाटील ही रसायनशास्त्र विषयांमध्ये व कु.आलिशा जालिंदर सोरदे ही वनस्पती शास्त्र विषयांमध्ये सेट परीक्षा पास झाल्याबद्दल त्यांचा त्यांच्या पालकांसमवेत प्राचार्य तर्फे सत्कार करण्यात आला.

          त्याचप्रमाणे 2024-25 मधील महाविद्यालयातील बी.ए.टॉपर,संकेत रामटेके,बी. एससी.टॉपर,कु.प्रांजली कामडी व बी.कॉम.टापर,सार्थक डेंगे यांचा सुद्धा प्राचार्या तर्फे सत्कार करण्यात आला.

       या कार्यक्रमाचे आयोजन व संचालन विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक, प्रा. डॉ.सुमेध वावरे यांनी केले होते.

        या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.