शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपवर नियमितपणे विदर्भातील प्रख्यात कवयित्री शैला चिमड्यालवार ह्या संस्कार धारा लिहित असल्यामुळे अनेक महिला व तरुणींच्या लेखणीला प्रोत्साहन मिळाले असल्याची प्रतिक्रिया नागपूरच्या समाजसेविका योगशिक्षिका तथा सहज सुचलं गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे यांनी आज सकाळी उपराजधानी नागपूरात या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.त्या एका योगा क्लासला आल्या होत्या.
त्या वेळी त्या सहज सुचलंच्या कार्याविषयी मनमोकळेपणाने बोलत होत्या.कवयित्री चिमड्यालवार ह्या मुळच्या सावली येथील रहिवाशी असून त्यांच्या कवितेचा दर्जा उत्तम असते.आता पर्यंत त्यांनी तीस पेक्षा अधिक संस्कार धाराचे भाग लिहिले आहे.सहज सुचलंने त्याची दखल घेत त्यांची स्तुती देखील केली आहे.शैला चिमड्यालवार ह्या एक कर्तृत्ववान महिला आहेत यात शंका नसल्याचे मायाताई शेवटी म्हणाल्या.
सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक व सहसंयोजिका नलिनी आडपवार यांच्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.



