Home Social सुरजागडच्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार… — जिंदाल स्टील प्लांट...

सुरजागडच्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार… — जिंदाल स्टील प्लांट सुरू करण्यास मदत करणार..  — माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची आरमोरीतील पत्रकार परिषदेत माहिती… 

ऋषी सहारे 

   संपादक

आरमोरी :- गडचिरोली जिल्ह्यात उद्योगाच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आरमोरी येथील पत्रकार परिषदेत मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा यांनी केले.

       पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी मंत्री धर्मराव बाबा म्हणाले आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषदेच्या ,ग्रामपंचायत च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र लढणार असल्याचा पर्याय आपण पक्षाकडे ठेवलेला होता परंतु महायुतीचे सरकार असल्याने पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे आपण आगामी निवडणुकीसाठी तयार असल्याची प्रतिपादन त्यांनी यावेळी ते केले आरमोरी ,वडसा या तालुक्यातील अनेक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या लोकांनी तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश घेतलेला आहे.

      काल राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस जिल्ह्यात आले होते त्या निमित्ताने आढावा बैठक तथा जिल्हा नियोजन समितीची बैठक असून नियोजित होती आणि त्याची माहिती मला आणि आमच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना होते परंतु काँग्रेस पार्टीचे आंदोलन केले.

       महायज्ञाचे आंदोलन हे सगळे नाटक असून मुख्यमंत्री हे पूर्वनियोजित असल्याने जिल्ह्यात आले होते आणि मी स्वतः मुख्यमंत्री सोबत होतो त्यामुळे मुख्यमंत्री आले आंदोलनामुळे अशा प्रकारचे श्रेय कुणी घेऊ नये असे यावेळी त्यांनी सांगितले सुरजागड प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवक हे कामावर घेतलेले असून 460 कोटीचा निधी अजून पर्यंत शिल्लक आहे मायनिंग विभागाचा आणि त्या माध्यमातून 321 गावांचा विकास त्या माध्यमातून होणार असून 25 किलोमीटरच्या आत मधील गावांचा विकास करणार असल्याचे प्रतिपादन केले या प्रकल्पामध्ये खास करून टेक्निकल इंजिनिअरिंग आणि इतर इंजिनिअरिंग विभागातील युवकांना यामध्ये समाविष्ट करण्याचा मानस सरकारचा आहे.

        सुरजागडच्या कामात जवळपास 3500 ते 4000 युवक काम करीत आहेत टेक्निकल लोकांना सुद्धा या प्रकल्पात समाविष्ट करणार आहे धर्मराव बाबा आत्राम यांनी गोंडवाना एंनटी कंपनी सुरू करणार असून या कंपनीमध्ये सुद्धा जिल्ह्यातील युवकांनाच रोजगार देण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

      सह पालकमंत्री जयस्वाल हे सुद्धा वारंवार जिल्ह्यात येत असून कोणतीही कामे असली तरी सह पालकमंत्र्याच्या माध्यमातून विकास करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

       विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या आमदाराना 500 कोटी रूपये दिल्याचा आरोप केला यावेळी या आरोपाला उत्तर देताना धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की वडेट्टीवार यांचे सुरजागडच्या प्रकल्पात यापूर्वी शंभर ट्रक त्यामध्ये सुरू होते परंतु काही दिवसानंतर शंभर ट्रक त्यांनी सुरजागडच्या कंपनीला स्वतः विकून मोकडे झाले.

      त्यामुळे तुझ्याकडे त्यामुळे सुरजागड प्रकल्पाविषयी बोलू नये आणि खोटा संदेश लोकांजवळ पोहोचवू नये असे यावेळी सांगितले वडसा तालुक्यात जिंदाल स्टील प्लॅन सुरू होणार होता परंतु कुरुड ,कोंढाळा ,वडसा,शिवराजपुर, या परिसरातील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध असल्याने सदर प्रकल्प आरमोरी तालुक्यामध्ये सुरू करावा अशी मागणी या पत्रकार परिषदेत नागरिकांनी केली असता आपण जागा उपलब्ध झाल्यास नक्कीच या ठिकाणी आपण हा प्रकल्प सुरू करन्यासाठी मुख्य मंत्र्यांकडे याचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

        राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी भोलू भाऊ सोमनानी यांच्या पत्नी ह्यासुद्धा आगामी जिल्हा परिषद मध्ये निवडणूक आमच्या पक्ष्याकडून लढणार असल्याचे यावेळी सांगितले.

        सदर पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर ,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी, माजी जिल्हा परिषद सभापती नाना नाकाडे, जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष डॉ.  सोनल कोवे , विधानसभा अध्यक्ष किशोर भाऊ तलमले, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवानी आरमोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष अमीन लालानी , सह विधानसभा अध्यक्ष सुनील नंदनवार, शहराध्यक्ष प्रदीप हजारे , सोनू वरखडे (खंडाते )माजी जिल्हा परिषद अध्यक्ष समय्या पसूला महिला जिल्हा कार्याध्यक्ष वृषाली भोयर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाद्यक्ष लीलाधर भरडकर ,जिल्हा नियोजन माजी सदस्य कल्पना तिजारे, आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.