राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा महसूल मंडळ कार्यालयात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ भव्य आयोजन करण्यात आले. या शिबिरात तालुक्यातील शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या महसूल विषयक समस्यांचे निराकरण करून घेतले. याप्रसंगी तहसीलदार राहुल पाटील होते.
यावेळी नगराध्यक्ष अनिता बोरकर, नायब तहसीलदार अनमधवार, नायब तहसीलदार शिंदे, नायब तहसीलदार आंबेकर सह सभापति सागर निरंकारि, सभापति कांता मठ्ठे,नगरसेवक एड उमेश वालदे नगरसेवक जयेंद्र सिंह चंदेल, रामभाऊ वैद्य,आशा तुलावी, जयश्री रासेकर,हेमलता नंदेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
लोकहितार्थ विविध सेवांचे वाटप व शिबिरादरम्यान नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्यात.
शेतकऱ्यांसाठी वारस फेरफार, डिजिटल ७/१२ व ८-अ चे वाटप आणि ‘अॅग्रीस्टॅक’ कामांची माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कामांसाठी लागणारे उत्पन्न, जात आणि रहिवासी दाखले तातडीने उपलब्ध करून देण्यात आले.
शासकीय योजना रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना आणि घरकुल योजनेच्या अर्जांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी श्री. नवले , ग्राम महसूल अधिकारी श्री. नरेंद्र ठाकरे, राहुल गेडाम, हितेश ब्रम्हनायक, कुलेटी , मन्ने , महसूल सेवक श्री. रवींद्र बोदेले, दामोदर नाकाडे, अशोक उईके, गायत्री फापनवाडे, शिला कोकोडे व महसूल मंडळातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रसंगी तहसीलदार राहुल पाटील यांनी “सामान्य नागरिकांचे प्रश्न शासकीय कार्यालयात न अडकता जागेवरच सुटावेत, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे,” असे प्रतिपादन केले. तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या या पुढाकाराचे मनापासून आभार मानले आहेत.



