Home Social श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना १ कोटींची मदत… ...

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना १ कोटींची मदत… — सुवर्णयुग सहकारी बँकेकडूनही २५ लाखांचा हातभार…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पुणे : राज्यातील अनेक भागात पडलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुढे सरसावला आहे. ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला.

        यावेळी ट्रस्टच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या सुवर्णयुग सहकारी बँकेकडूनही २५ लाख रुपयांची आर्थिक मदत पूरग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आली.

         या प्रसंगी आ. हेमंत रासने, ट्रस्टचे अध्यक्ष सुनीलभाऊ रासने, कोषाध्यक्ष महेशजी सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सहकार्याध्यक्ष सचिनजी आखाडे, संघटक श्री.सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने, प्रतीक घोडके, आणि सुवर्णयुग बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश परदेशी उपस्थित होते.

        श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने, ही मदत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवी आशा, नव्या सुरुवातीचे प्रकाशपर्व ठरो, अशी भावना या वेळी आ.हेमंत रासने यांनी व्यक्त केली.