राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्ता हा पक्षांचा आत्मा आहे.
राष्ट्रसेवा, सुशासन आणि सर्वसमावेशक विकास या तत्वांवर आधारित भारतीय जनता पक्षाने देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले असून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘अंत्योदय’च्या विचारसरणीला केंद्रस्थानी ठेवून, प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा पक्षाचा सातत्यपूर्ण प्रयत्न चालू असून भारतीय जनता पार्टी वाढवण्याकरिता श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी व अनेक पक्ष अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना जोडून भाजपा पक्ष वाढवण्याचा काम केला आहे त्यामुळेच आज देशाची यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजप पक्षाला ओळखला जातो आहे. असे गौरवौदगार मान्यवरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये,भाजपा ज्येष्ठ नेते गणपत सोनकुसरे, महिला तालुकाध्यक्ष गंधा ताई बनसोड यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात भाजपा ओबीसी जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, अनुसूचित जाती माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक एड.उमेश वालदे, माजी तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक रामभाऊ वैद्य, शहर अध्यक्ष तथा सभापती सागर निरंकारी, भाजप तालुका महामंत्री विनोद नागपूरकर आदिवासी आघाडीचे नेते कृष्णाजी चंद्रमा, आदिवासी आघाडी तालुकाप्रमुख रमेश पुराम, रामकृष्ण मुंगणकर,जिल्हा सचिव रुपाली कावळे,तालुका उपाध्यक्ष जयश्रीताई मडावी महिला आघाडी तालुकाध्यक्ष रजनीगंधा बनसोड, शहर महामंत्री सुनिता दखणे शहर महामंत्री कल्पना मांडवे, कविता खडसे महामंत्री मंगेश मांडवे अनुसूचित जाती मोर्चाचे अंगराज कराडे, सुखदेव कापगते , विलास बनसोड, तुषार कुथे,सुशील बेहार, किशोर बनसोड स्वप्निल खोब्रागडे ,जगदीश कुमरे ,लोमेश किरसाण तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निमित्ताने नागरिकाना थंड ताकाचे वितरण करण्यात आले.



