ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महाराष्ट्र सारस्वताचे अक्षय वैभव आहे :- सचिव अजित वडगावकर… — ओळख श्री ज्ञानेश्वरीची स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव… 

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी : श्री ज्ञानेश्वरी वाचताना संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या अगदी निकट येऊन आपल्याशी बोलत आहेत, असे आपल्याला वाटते. ज्ञानेश्वरांनी तत्त्वज्ञान व साक्षात्कार यांचे अतिशय सुंदर व प्रभावी वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरांच्या ठायी तत्त्वज्ञान, काव्य आणि आत्मानुभूती यांचा झालेला अद्भुत त्रिवेणीसंगम हेच त्यांच्या गीतेवरील भाष्याचे महान वैशिष्ट्य होय, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महाराष्ट्र सारस्वताचे अक्षय वैभव आहे असे मत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी व्यक्त केले.

           चाकण येथील स्व.गुलाबराव गोरे प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलातील स्व.आ.सुरेशभाऊ गोरे माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरी, नाटक- खरी श्रीमंती व जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा 2024 या स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न झाले. संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान,पत्रकार संघ आळंदी यांच्या ओळख श्री ज्ञानेश्वरी हा उपक्रम राबविण्यात आला होता. यामधील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या गौरविण्यात आले.

            बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास ओळख श्री ज्ञानेश्वरीचे तुकाराम महाराज कुरकुटे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, मनीषाताई गोरे, संस्थेचे अध्यक्ष विकासभाऊ गोरे, शिवाजी विद्यामंदिर चाकण चे माजी प्राचार्य प्रा.दिलीप गोरे, अर्जुन मेदनकर, महादेव गोरे, तुकाराम गोरे, प्राचार्या प्रमिला गोरे व माधुरीताई गोरे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.