शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
भद्रावती :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,चौखामेळा मुलांचे वसतिगृह,परिवर्तन मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह,मातोश्री सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह तसेच सत्यशोधक मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह,वरॊरा यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर,निरोप समारंभ (वर्ग १० वी व १२ वी) व त्यागमूर्ती माता रमाई जयंतीचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.भाऊरावजी चिखले (अध्यक्ष,बुद्धिस्ट कर्मचारी समिती,वरॊरा) राहणार आहेत.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.धनंजय साळवे (जिल्हा समाजकल्याण अधिकारी,जि. प.चंद्रपूर),श्री.शरद भस्मे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो. स्टे. वरॊरा), श्री.प्रीतमदास सोनारकर (माजी प्राचार्य,भारत विद्यालय,चारगाव खुर्द) व श्री.सुधाकर चौरे (माजी मुख्याध्यापक,जि.प.उ.प्रा. शाळा,कोंढाळा) हे असणार आहेत.आणि हे मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी,शिस्त,सातत्य,आत्मविश्वास व योग्य दिशेने अभ्यास करण्याचे महत्त्व मार्गदर्शकांकडून पटवून दिले जाणार आहे.
तसेच त्यागमूर्ती माता रमाई यांच्या सामाजिक कार्याचा व प्रेरणादायी जीवनप्रवासाचा आढावाही घेण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम शनिवार,दि.७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता परिवर्तन मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह,वरॊरा येथे होणार असून विद्यार्थी,पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



