“समर्थ महाविद्यालय लाखनी येथे अर्थसंकल्पावर चर्चासत्र”… — “महविद्यालयीन विद्यार्थांमध्ये आर्थिक साक्षरता आणने हेतू अभिनव उपक्रम”…

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

         स्थानिक समर्थ महाविद्यालय लाखनी येथे 5 फेब्रुवारी 2024 रोज सोमवारला आय क्यू ए सी विभागाच्यावतीने अंतरीम अर्थसंकल्पीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

            चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे, प्रमुख वक्ते म्हणून वाणिज्य विभाग प्रमुख डॉ सुनंदा देशपांडे, डॉ संगीता हाडगे, डॉ सुरेश बंसपाल, डॉ धनंजय गभने प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

           नुकताच केंद्र सरकारच्या वित्त विभागाद्वारे निर्मला सीतारमण यांनी भारतीय अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अंतरीम अर्थसंकल्पाची महती विद्यार्थ्यांना समजावी या हेतूने समर्थ महाविद्यालय लाखनी येथे अर्थसंकल्पीय चर्चासत्र आयोजित केले होते.

           याप्रसंगी डॉ सुनंदा देशपांडे यांनी पुढील काळात देशातील पैसा कोणकोणत्या संबंधित खात्यांवर खर्च केला जाईल. “आला रुपया आणि गेला रुपया” या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन त्यांनी याप्रसंगी केले.

          डॉ संगीता घाडगे यांनी अर्थसंकल्पातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना होणाऱ्या फायद्यांवर ते बोलत होते. तर डॉ सुरेश बंसपाल यांनी अर्थसंकल्पातून विद्यार्थ्यांना होणारे फायदे ते अभ्यासाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

             कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे यांनी अर्थसंकल्पावर आपण चर्चासत्र घेतो आणि त्यातून आपल्या विद्यार्थ्यांना अर्थसंकल्प म्हणजे काय या गोष्टीची माहिती महाविद्यालयातून सांगतो ही अत्यंत आनंदाची बाब आहे. यामुळे विद्यार्थी त्या दृष्टिकोनातून विचार करण्यास सक्षम होतात. महविद्यालयीन विद्यार्थांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण होते, कमावणे आणि खर्च करणे या गोष्टीचे त्याला महत्त्व या जीवन मुल्यांची जोपासना जपली जाते असे सांगितले.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन आय क्यू ए सी समन्वयक डॉ. धनंजय गभणे यांनी केले आभार प्रा. अजिंक्य भांडारकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते.