पालोरा येथे भव्य आरोग्य शिबिर… — तालुकातंर्गत ग्राम पालोरा येथे भव्य मोफत रोगनिदान शिबीर संपन्न.. — एकुण ४२५ रुग्णनी घेतला मोफत तपासणी व औषधांचा लाभ..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- पारशिवनी तालुकातंर्गत जि.प.शाळा पालोरा येथे घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय शिबिरात गरजू रुग्णांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या तज्ञ डॉक्टरां मार्फत करण्यात आल्या.

                सामान्यरोग तपासणी (जनरल फिजीशियन),स्त्रीरोग तपासणी,बालरोग तपासणी,कान-नाक-घसा तपासणी,नेत्ररोग तपासणी,अस्थीरोग तपासणी,हृदयरोग तपासणी,दंतरोग तपासणी सोबतच कर्करोग (कॅन्सर) सारख्या आजाराच्या तपासण्या मोफत स्वरूपात मिळाल्या की आपण करत असलेल्या कार्याचे समाधान प्राप्त होते असे मनोगत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री श्री.सुनील बाबू केदार यांनी आरोग्य निदान निमित्ताने काढले.

               आमदार अँड जैस्वाल,माजी मंत्री व जिल्हा काग्रेस अध्यक्ष राजेन्द्र मुळक व पर्यटक मित्र चन्द्रपाल चौकसे यांची रोगनिदान शिबिरानिमित्ताने प्रमुख उपस्थितीत होते.

         भव्य रोगनिदान शिबीर आयोजन नागपुर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सहाय्याने व पारशिवनि तालुका प्राथमिक आरोग्य केन्द्रा मार्फत करण्यात आले होते.

         उपस्थित सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.

                    सदर कार्यक्रमात प्रामुख्याने,कु.कुंदाताई राऊत ( उपाध्यक्ष- व आरोग्य सभापती जिल्हा परिषद नागपूर ) आरोग्य समिती सदस्या तथा जिल्हा परिषद सदस्य पुष्पा चाफले,श्री.अरुनजी हटवार,सौ.कविताताई साखरवाडे,सौ.मनीषाताई फेंडर,सलिल देशमुख,दिक्षा मुलताईकर,निलीमा उईके आरोग्य समिती सदस्य,जि.प.आरोग्य विभागचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी व समिती सचिव डॉ.अजय डवले सह पारशिवनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय माने,जि.प.शिक्षण सभापती राजकुमार कुसुवे,जि.प.सदस्य अर्चना भोयर,व्यकट कारेमोर,रश्मि बर्वे,पंचायत समिती सभापती मंगला निबोने,उपसभापती करुणा भोवतेसह पंचायत समितीचे सर्व सदस्यगण,ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,ग्रा.प.सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. 

        पालोरा येथे आयेजित रोगनिदान शिवरात एकुण ४२५ रुग्णांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.यात २०१ महीलांचा समावेश होता तर २२४ पुरुषनी शिविरात भाग घेतला.

         सामान्य रुग्ण तपासणी ६५, बालरोग २१,स्त्रीरोग१४,हदयरोग २९, नेत्ररोग १०१,अस्थिरोग २३,कुष्ठरोग१३,क्षयरोग २५, सिकलसेल २२,कर्करोग ४,नाक-कान- गळा २२,असंस्र्गजन्य रोग १०१ इत्यादी अनेक प्रकारची तपासणीत रुग्णानी मोफत तपासणी व औषधांचा लाभ घेतला.

        या प्रसंगी रुग्ण तपारणीत तज्ञ डॉक्टर मध्ये तालुका वैधकिय अधिकारी डॉ. संजय माने,डॉ.दिप्ती पुसदेकर,डॉ.भगत,डॉ.अरविंद खोब्रागडे,डॉ.शेडें,डॉ.सायली शेळके,डॉ.माधुरी गावंडे,बोरकर, जयक्षी,डॉ.इरफान पठाण,डॉ. अशफाक शेख ,डॉ.महल्ले,जंगम मॅडम,हर्षवानी पवार,मृणाली डोणारकर,माया कंभाले,कुंदा भोमले, यु.एम.चव्हाण,आशा डांगरे,शारदा पाटोडे,रजनी ठाकरे,विनोद नाईकवाडे,विलास अंबुरे,तादुळकर, खुबाळकर,अर्थव बंड,यशवंत घोटेकर,त्रिवेणी सहारे मँडम सह तालुकाच्या पाच आरोग्य केन्द्र व उपकेन्द्राचे अधिकारी,कर्मचारी आशार्वकरसह नागरिकानी,पंचायत समिती,ग्रापंचे कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.