“ओबीसी आरक्षण,अन्नत्याग आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारा चिमूर क्रांतीभूमीत ७ डिसेंबर २०२३ पासून अक्षय लांजेवार,राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे चिमूर तालुकाध्यक्ष व अजित सुकारे अन्नत्याग आंदोलन सुरू करणार..

    रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर:-

        चंद्रपुर मध्ये ओबीसींच्या मागण्या करिता रवींद्र टोंगे, विजय बलकी,आणि प्रेमानंद जोगी यांनी ११ सप्टेंबर २०२३ पासून सुरू केले होते,२९ ऑक्टोबर २०२३ ला सह्याद्री अतिथीगृहावर सरकारची ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चां नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२३ ला चंद्रपुरात येऊन अन्नत्याग आंदोलन आश्वासन देऊन सोडविले होते.

          परंतू ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य न झाल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या चिमूर क्रांतीभूमीतून ७ डिसेंबर २०२३ पासून अक्षय लांजेवार,राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे चिमूर तालुकाध्यक्ष व अजित सुकारे अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत.

          राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ओबीसी मंत्री अतुल सावे,पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जिल्हाधिकारी मार्फ़त याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.