जि.प. शाळा वाकपूर दादापुर येथे उष:काल कलनिकेतन संस्थेतर्फे विविध साहित्य वाटप…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

         जिल्हा परिषद शाळा वाकपूर दादापूर येथे उषःकाल कलानिकेतन संस्था नागपूरतर्फे विविध शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

           याप्रसंगी गावचे पोलीस पाटील राजू सोनवणे, राशन दुकानदार नंदकिशोर कराळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण ढवळे, रामेश्वर गडलिंग, नैसींग पवार, शंकरराव कवाने, मुख्याध्यापक सुरज मंडे, सौ.अर्चना कवाने शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

           शालेय साहित्य शाळेला मिळण्याकरिता शंकर कवाने सर यांनी विशेष प्रयत्न केले. शालेय साहित्यामध्ये पाहुण्यांचे हस्ते वाटप करण्यात आले त्यामधे प्रामुख्याने पेपर पॅड, दोन पेन्सिल, पेन, स्केल, शापणर, रबर, तसेच इतर साहित्य मध्ये पाणी बॉटल, टिफीन डबा, हेअर ऑईल, पाँड्स पावडर आणि खाण्याच्या साहित्यामध्ये आलू चिप्स, शेंगदाणा पट्टी, बिस्किट पुडा, फराळी चिवडा आणि लिक्विड प्रोटीन्स अशा विविध प्रकारच्या साहित्याचे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

            साहित्य मिळाल्यानंतर मुलांचे चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना होता. विद्यार्थांना साहित्य मिळाल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले. साहित्य मिळवून दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री सूरज मंडे यांनी उषःकाल कलानिकेतन संस्था आणि त्याचे सर्व पदाधिकारी आणि शकर कवाणे सर यांचे शाळेच्या व पालकांचे वतीने आभार व्यक्त केले.