गडचिरोली जिल्ह्यात ५ दिवस ढगाळलेल वातावरण राहणार… — आजपासून तिन दिवस मेघगर्जनेसह हलक्या व मध्यम स्वरुपाचा होणार पाऊस..

 

     राजेंद्र रामटेके 

कुरखेडा ग्रामीण प्रतिनिधी.. 

         भारतीय हवामान विभाग अंतर्गत प्रादेशिक हवामान केंद्र,नागपूरच्या जिल्हास्तरीय हवामान अंदाजानुसार,गडचिरोली जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ ते पूर्णता ढगाळ राहून दिनांक ०६ ते ०८ सप्टेंबर २०२३ रोजी सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.

               तर दिनांक ०९ व १० सप्टेंबर २०२३ रोजी बहुदा सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.

           चेतावणी

 दिनांक ०६ व ०८ सप्टेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना मुसळधार पावसाचा तर दि.०७ सप्टेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना व मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा चा गडचिरोली जिल्ह्यास इशारा देण्यात आला आहे.

           सौजन्य:- जिल्हा कृषि हवामान केंद्र,कृषि विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली..